शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

धापेवाडा उपसा सिंचन योजनेसाठी दोनशे कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 11:31 PM

धापेवाडा उपसा सिंचन योजनेकरीता लागणारा २०० कोटी रुपयांचा निधी त्वरीत उपलब्ध करुन दिला जाईल. यापैकी १०० कोटी रुपये त्वरीत तर उर्वरित १०० कोटी रुपये आधीचा निधी खर्च होण्यापूर्वी उपलब्ध करुन दिला जाईल.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस : तिरोडा येथील कार्यक्रमात घोषणा, प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण करणार

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : धापेवाडा उपसा सिंचन योजनेकरीता लागणारा २०० कोटी रुपयांचा निधी त्वरीत उपलब्ध करुन दिला जाईल. यापैकी १०० कोटी रुपये त्वरीत तर उर्वरित १०० कोटी रुपये आधीचा निधी खर्च होण्यापूर्वी उपलब्ध करुन दिला जाईल. त्यामुळे अल्पावधीतच ही योजना पूर्ण होणार आहे. याच योजनेचा दुसरा टप्पा असून त्यामुळे ९१ हजार हेक्टर जमिन सिंचनखाली येणार आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी सुखी आणि समृध्द होतील असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.तिरोडा क्षेत्रातील विविध सिंचन प्रकल्पाच्या कामांचा भूमिपूजन कार्यक्रम शनिवारी (दि.२३) येथील जिल्हा परिषद कन्या विद्यालयाच्या पटांगणावर आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. पालकमंत्री राजकुमार बडोले, भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, तिरोडा नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, गोरेगाव नगराध्यक्ष आशिष बारेवार, जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, न.प.उपाध्यक्ष सुनील पालांदूरकर, न.प.मुख्याधिकारी विजय देशमुख, मुख्य कार्यपालन अधिकारी राजा दयानिधी, गोंदिया नगराध्यक्ष अशोक इंगळे, ज्येष्ठ भाजप कार्यकर्ता बाळूभाऊ मलघाटे उपस्थितीत होते.देवेंद्र फडणवीस म्हणाले, मागील साडेचार वर्षात शेतकऱ्यांना ५० हजार कोटीची मदत शासनाने केली आहे. तर यावर्षी ७ हजार कोटी रुपये शेतकºयांना मदतीसाठी दिले आहे. शासनाने शेततकºयांचा माल हमीभावाने खरेदी केला.तिरोडा तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तरी चिंता करण्याचे कारण नाही. शेवटच्या शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा झाल्याशिवाय योजना बंद होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. हे सरकार गरीबांचे सरकार आहे. गेल्या ६५ वर्षात ५ हजार किलोमीटर रस्ते झाले तर मागील चार वर्षात २० हजार किमी राष्ट्रीय रस्ते, पीडब्ल्यूडी महामार्ग १०,००० किमी व गाव रस्ते २०००० किमी असे पन्नास हजार किमीचे रस्ते पूर्ण करुन गाव-शहर-देशाला जोडले गेले आहे. यासाठी गडकरी साहेबांचे आपण आभार मानले पाहिजे. मी मागे विरोधी पक्षात असताना विदर्भाच्या विकासासाठी ओरडत होतो. पण निधी मिळत नव्हता. विदर्भाच्या हिश्याचे विदर्भाला कधीच मिळत नव्हते. ते आम्ही परत आणले. गेल्या ५० वर्षात जेवढा निधी विदर्भाला मिळाला नाही त्याहीपेक्षा जास्त निधी विदर्भासाठी मिळाला असल्याचे सांगितले. तिरोडा तालुक्यातील धापेवाडा सिंचन प्रकल्पाचे काम त्वरीत पूर्ण करुन या परिसरातील शेतकºयांची सिंचनाची समस्या मार्गी लावण्यात येईल. प्रकल्पासाठी निधीची कमतरता पडणार याची पूर्णपणे आपण काळजी घेवू. धापेवाडा सारखेच राज्यातील इतरही सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यात येतील अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.नितीन गडकरी म्हणाले, पुढील मार्चपर्यंत गंगेचे पाणी पूर्णत: स्वच्छ होणार आहे. २६ हजार कोटी रुपये यासाठी खर्च होत आहेत. रस्ते निर्माण करताना त्यासाठी लागणारी माती, मुरुम हे मामा तलाव, शेततळे, नाल्या,नदी खोलीकरण, रूंदीकरण यातून घेतल्यास पाणी साठवण जास्त होईल.कॅनलऐवजी पाईप लाईनचा वापर होत असल्याने पाण्याचा अपव्यय होत नाही. महाराष्ट्रातील सिंचनाचा प्रश्न सुटला तर ७५ टक्के प्रश्नच सुटतील. प्रधानमंत्री सिंचन प्रकल्प २६ मंजूर करुन २५ टक्के भारत सरकार व ७५ टक्के नाबार्डचे कर्ज यातून पूर्ण होणार आहेत. परिसरातील सिंचन प्रकल्प मार्गी लागल्यास शेतकºयांना दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागणार नाही. त्यादृष्टीने काम सुरु असल्याचे सांगितले. रस्ते, सिंचन यांना प्राध्यान दिले जात असल्याचे ते म्हणाले. आमदार विजय रहांगडाले यांनी आपल्या प्रास्ताविकातून रस्ते आणि सिंचनासाठी निधी व कामे केल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मदन पटले यांनी केले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस