शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

९ हजार नुकसानग्रस्तांना २ कोटी ७० लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 9:54 PM

जिल्ह्यात २१ मे २०१६ रोजी वादळी वाऱ्यांमुळे वित्तहाणी झालेल्या लोकांना विशेष मदत महाराष्ट्र शासनाने दिली आहे. या एकाच दिवशी जिल्ह्यातील ९ हजार ३३४ लोकांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला होता.

ठळक मुद्देतहसीलदारांकडे निधी वळता : जिल्ह्यातील पिडितांना विशेष मदत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात २१ मे २०१६ रोजी वादळी वाऱ्यामुळे वित्तहाणी झालेल्या लोकांना विशेष मदत महाराष्ट्र शासनाने दिली आहे. या एकाच दिवशी जिल्ह्यातील ९ हजार ३३४ लोकांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला होता. या नुकसानग्रस्तांना मदत म्हणून २ कोटी ७० लाख २१ हजार ५०० रूपये शासनाने मंजूर केले आहे. त्या नुकसानग्रस्तांना सदर मदत देण्यासाठी ही रक्कम तहसीलदारांकडे वळती करण्यात आली आहे.जिल्ह्यातील गोरेगाव, तिरोडा, सडक-अर्जुनी, अर्जुनी-मोरगाव, देवरी, आमगाव, सालेकसा व गोंदिया या आठही तालुक्यात २१ मे २०१६ रोजी वादळी वाऱ्याने घरांचे व गोठ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मंत्रिमंडळाने या नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी ‘विशेष बाब’ म्हणून मदत देण्यासाठी २३ मे २०१७ रोजी शासन निर्णय काढला. यासंदर्भात ८ जून २०१७ रोजी शासनाचे शुध्दीपत्रक काढण्यात आले. ३ आॅगस्ट २०१७ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला. या वादळवाऱ्यात अंशत: पडझड झालेल्या ७ हजार ५३६ कच्ची घरे जमीनदोस्त झाली होती. ३६६ पक्क्या घरांना अंशत: झळ पोहचली होती. अश्या एकूण ८ हजार ६५ घरांचे नुकसान झाले. तर १ हजार २६९ गोठ्यांचे नुकसान झाले.गोंदिया तालुक्यात २ हजार ७३२ अंशत: कच्ची घरे पडले. १५९ कच्चे घरे जमीनदोस्त झालीत. ३६५ पक्की घरे अंशत: अशा ३ हजार २५६ घरांचे नुकसान झाले. गोरेगाव तालुक्यात १ हजार १०३ अंशत: कच्ची घरे पडली. ४ कच्चीे घरे जमीनदोस्त झालीत अशा १ हजार १०७ घरांचे नुकसान झाले. तर ५८ गोठ्यांचे नुकसान झाले होते. तिरोडा तालुक्यात ९८६ अंशत: कच्ची घर पडली. तर ११४ गोठ्यांचे नुकसान झाले होते. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात १ हजार ८१८ अंशत: कच्चे घर पडले. तर २० गोठ्यांचे नुकसान झाले. देवरी तालुक्यात ३० अंशत: कच्चे घर पडले. तर सात गोठ्यांचे नुकसान झाले. आमगाव तालुक्यात ५८२ अंशत: कच्चे घर पडले. तर १०५६ गोठ्यांचे नुकसान झाले. सालेकसा तालुक्यात १५३ अंशत: कच्चे घर पडले. चार गोठ्यांचे नुकसान झाले. सडक-अर्जुनी तालुक्यात १३२ अंशत: कच्चे घर पडले. १० गोठ्यांचे नुकसान झाले होते. त्यांना मदत म्हणून २ कोटी ७० लाख २१ हजार ५०० रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.सर्वाधिक मदत गोंदिया तालुक्यात२१ मे २०१६ रोजी वादळी वाऱ्यांमुळे वित्तहाणी झालेल्या लोकांना विशेष मदत म्हणून गोंदिया तालुक्याला एक कोटी ३५ लाख ३ हजार ३५० रूपये, गोरेगाव तालुक्यासाठी ३१ लाख ६० हजार ५० रूपये, तिरोडा तालुक्यासाठी ३३ लाख ९४ हजार ६०० रूपये, अर्जुनी-मोरगाव तालुक्यासाठी २१ लाख १५ हजार ७५० रूपये, देवरी तालुक्यासाठी १ लाख २ हजार ३०० रूपये, आमगाव तालुक्यासाठी ४० लाख ८० हजार, सालेकसा तालुक्यासाठी २ लाख ९४ हजार ३०० रूपये, सडक - अर्जुनी तालुक्यासाठी ३ लाख ७१ हजार १५० रूपयांचा निधी तहसीलदारांकडे वळता करण्यात आला आहे.