शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

स्कूल व्हॅन उलटून २ विद्यार्थी जखमी; सुदैवाने जीवीत हानी टळली

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: January 30, 2025 17:33 IST

Gondia : तिरोडा-गोंदिया मार्गावरील घडली

गोंदिया : विद्यार्थी वाहून नेणारी स्कूल व्हॅन उलटल्याने चालकासह २ विद्यार्थी जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि.३०) सकाळी सेजगाव ते नहरटोला मार्गावर घडली. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली. जखमी विद्यार्थ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.प्राप्त माहितीनुसार काचेवानी येथील आदिशक्ती पब्लिक स्कूल असून यात नर्सरी ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या शाळेत

परिसरातील सेजगाव व इतर गावातील विद्यार्थी शिक्षण घेतात. गुरुवारी (दि.३०) सकाळी ९ वाजता स्कूल व्हॅन क्रमांक एमएच ३५ एजे १७५० ने चालक सुनील श्रीबासरी (२७) रा. पालडोंगरी हा सेजगाव येथून विद्यार्थ्यांना घेवून काचेवानी येथे जात होता. सेजगाव ते नहरटोला दरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने स्कूल व्हॅन रस्त्याच्या कडेला उलटली. यात चालकासह अक्षित गितेश अंबुले व भावी भरतलाल रहांगडाले हे दोन विद्यार्थी जखमी झाले. तर स्कूल व्हॅॅनमधील इतर आठ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. अपघात झाल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी धावत येत मदत कार्याला सुरुवात केली. तसेच या घटनेची माहिती गंगाझरी पोलिस स्टेशन आणि शाळेच्या व्यवस्थापनाला दिली. जखमी दोन विद्यार्थ्यांवर गोंदिया येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी गंगाझरी पोलिसांनी स्कूल व्हॅन चालकावर गुन्हा दाखल केला आहे. 

स्कूल व्हॅनमध्ये या विद्यार्थ्यांचा समावेशअपघातग्रस्त स्कूल व्हॅनमध्ये अक्षित गितेश अंबुले व भावी भरतलाल रहांगडाले, सानवी गितेश अंबुले, शिवन्या भगत, क्रिश रहांगडाले, मेहान भगत, शिवम मेश्राम, तोषांत रहांगडाले, गुंजन रहांगडाले, रिनल रहांगडाले, लक्ष पटले आदी विद्यार्थ्यांचा समावेश होता. यापैकी अक्षित गितेश अंबुले व भावी भरतलाल रहांगडाले हे दोन विद्यार्थी जखमी झाले. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही.

अपघातानंतर गावकऱ्यांमध्ये रोष

सेजगाव ते नहरटोला येथे स्कूल व्हॅनचा अपघात झाल्यानंतर गावकऱ्यांनी या घटनेला घेवून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीचा मुद्दा उपस्थित केला. तसेच विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात टाकणाऱ्या वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यामुळे घटनास्थळावर काही वेळ तणावपुर्ण स्थिती निर्माण झाली होती.

टॅग्स :gondiya-acगोंदियाAccidentअपघात