शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

१९ जोडपी विवाहबद्ध

By admin | Updated: April 26, 2017 00:53 IST

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा वारसा घेऊन माळी समाज स्वत:च्या

 सहषराम कोरोटे : घोनाडी क्षेत्रात लिफ्ट इरिगेशन व बँक शाखेची त्वरित व्यवस्था करा देवरी : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा वारसा घेऊन माळी समाज स्वत:च्या परिश्रमाच्या भरवश्यावर व्यवसायीक शेती व लहानसहान गृहउद्योग करुन आपला परिवार आणि समाजाला पुढे नेण्याचे काम करीत आहे. एक नवीन ओळख निर्माण करण्याचे काम माळी समाज करीत आहे. परंतु घोनाडी क्षेत्रातील शेतकरी व शेतमजूर नैसर्गिक दुष्काळात सिंचनाअभावी आर्थिक अडचणीला सामोरे जात आहे. अनेक वर्षापासून या भागात एक लिफ्ट इरीगेशनची आणि आर्थिक देवाण-घेवाण करण्याकरिता बँक शाखेची येथील लोकांची मागणी आहे. या मागणीचा शासन स्तरावर पाठपुरावा करुन येथील लोकप्रतिनिधींनी त्वरित पूर्ण करावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे यांनी केली आहे. कोरोटे हे घोनाडी येथे महात्मा ज्योतिबा फुले माळी समाज विकास संस्थेद्वारे रविवार (ता.२३) आयोजित १९ वर-वधू जोडप्यांच्या आदर्श सामूहिक विवाह सोहळ्यात अतिथी म्हणून मार्गदर्शन करीत होते. दीप प्रज्वलन करून उद्घाटन आमदार संजय पुराम यांनी केले. अध्यक्षस्थानी विदर्भ माळी समाजाचे अध्यक्ष राजेंद्र महाडोरे होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे, एपीओ कॅम्प बोंडेचे पोलीस निरीक्षक काळे, देवरीचे बँक व्यवस्थापक सोभा गुरनुले, तालुका भाजपाध्यक्ष प्रमोद संगीडवार, घोनाडीचे सरपंच शालीकराम गुरनुले, पोलीस पाटील दयाराम पंधरे, पालांदूर (जमी) चे तंटामुक्त समिती अध्यक्ष भास्कर निकोडे, माजी सभापती कामेश्वर निकोडे, सिंगनडोहचे मनोहर मिरी, माळी समाजाचे तालुकाध्यक्ष यशवंत गुरनुले यांच्यासह माळी समाजातील गावागावातून शेकडोच्या संख्येत महिला, पुरूष व युवक मंडळी उपस्थित राहून या विवाह सोहळ्यातील १९ नवजोडप्यांना सुखी संसाराच्या शुभेच्छा देऊन आपले आशीर्वाद दिले. कोरोटे पुढे म्हणाले, देवरी तालुक्यातील दुर्गम भाग घोनाडी या क्षेत्रात मोठ्या संख्येत माळी समाज राहतो आणि त्यांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती आहे. आपल्या शेतातून पारंपरिक पद्धतीने शेती उद्योगाचे काम करतो. परंतु नैसर्गिक दुष्काळात सिंचनाअभावी या समाजाला खूप हालअपेष्टा सहन करावे लागते. अशा परिस्थितीत शासनाकडून कसलीही आर्थिक मदत नाही आणि सिंचनाकरिता पाण्याची सोय नाही, अशा दुहेरी समस्येत या भागातील शेतकरी व शेतमजूर आपले जीवन जगत आहेत. त्याचप्रमाणे या भागात दैनंदिन देवाणघेवाणचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी आपले कामधंदे सोडून चिचगड किंवा देवरीला जावे लागते. अद्याप या भागात कोणात्याही बँकेने आपली शाखा उघडलेली नाही. या दोन्ही समस्येबाबद अनेक वर्षापासून येथील लोक अनेक वर्तमानपत्र व शासनकर्त्यांना निवेदनातून कळविण्यात आले. तरी सुद्धा या गंभीर मुद्याकडे कोणात्याही लोकप्रतिनिधींनी अद्याप लक्ष दिलेले नाही, ही एक मोठी शोकांतिका आहे. शासनकर्त्यांनी या भागात एक लिफ्ट इरीगेशन व बँक शाखेचे शुभारंभ त्वरित करावे, अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे यांनी केली आहे. प्रास्ताविक सुदाम मोहुर्ले यांनी मांडले. संचालन झाशीनगरचे समाज अध्यक्ष डॉ. यशवंत गुरनुले यांनी केले. आभार घोनाडी समाजाचे उपाध्यक्ष विनोबा लेंडे यांनी मानले.(प्रतिनिधी)