लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने जिल्हावासीयांची काळजी वाढली आहे. मात्र जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर चांगला असल्याने आतापर्यंत एकूण १६५ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाले आहे. मंगळवारी (दि.१४) नवीन कोरोना बाधितांची भर पडली नाही तर १ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.२५ जून रोजी जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाल्यानंतर कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत गेली. त्यामुळे कोरोना बाधितांचे द्विशतक पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक रूग्ण बाहेरील जिल्हा आणि विदेशातून आलेले आहेत. त्यामुळे जिल्हावासीयांच्या चिंतेत भर पडली आहे. जिल्ह्यात मंगळवारी (दि.१४) नवीन कोरोना बाधिताची नोंद झाली नाही. तर १ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने त्याला येथील जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमधून सुटी देण्यात आली.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २१८ कोरोना बाधित आढळले. यापैकी १६५ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहे. तर ३ कोरोना बाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण ४८ कोरोना अॅक्टीव रूग्ण आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ५९९५ स्वॅब नमुने घेवून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी २१८ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर ५५७७ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. १३४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे.६६ स्वॅब नमुन्यांच्या अहवालाबाबत अद्यापही अनिश्चितता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्यांना क्वारंटाईन कक्षात ठेवले जात आहे. संस्थात्मक क्वारंटाईन कक्षात ४०० तर होम क्वारंटाईनमध्ये ११३९ व्यक्ती आहे.कंटेन्मेंट झोनमध्ये वाढजिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना बाधित रूग्ण आढळलेला परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषीत केला जात आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण २० कंटेन्मेंट झोन आहेत. यामध्ये, गोंदिया तालुक्यातील मुंडीपार, फतेहपूर, डोंगरगाव, शेजगाव, पारडीबांध, कुंभारेनगर, सालेकसा तालुक्यातील पाऊलदौना, पाथरी व शारदानगर, तिरोडा तालुक्यातील तिरोडा (सुभाष वार्ड), बेरडीपार, बेलाटी-खुर्द, वीर सावरकर वार्ड, भुतनाथ वार्ड आणि गराडा, गोरेगाव तालुक्यातील भडंगा व डव्वा आणि सडक-अर्जुनी तालुक्यातील राका, सौंदड व खोडशिवणीचा समावेश आहे.
जिल्ह्यातील १६५ कोरोना बाधित झाले कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 05:00 IST
२५ जून रोजी जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाल्यानंतर कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत गेली. त्यामुळे कोरोना बाधितांचे द्विशतक पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक रूग्ण बाहेरील जिल्हा आणि विदेशातून आलेले आहेत. त्यामुळे जिल्हावासीयांच्या चिंतेत भर पडली आहे. जिल्ह्यात मंगळवारी (दि.१४) नवीन कोरोना बाधिताची नोंद झाली नाही.
जिल्ह्यातील १६५ कोरोना बाधित झाले कोरोनामुक्त
ठळक मुद्दे१३४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अप्राप्त : कंटेन्मेंट झोनमध्ये झाली वाढ