शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

गोंदिया जिल्ह्यात वर्षभरात १६ मातामृत्यू (डमी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:55 IST

गोंदिया : बालमृत्यू व माता मृत्यू रोखण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या असल्या तरी बालमृत्यू किंवा मातामृत्यू रोखणे ही बाब ...

गोंदिया : बालमृत्यू व माता मृत्यू रोखण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या असल्या तरी बालमृत्यू किंवा मातामृत्यू रोखणे ही बाब शासनासाठी कठीण होऊन बसली आहे. गोंदिया जिल्ह्याची परिस्थिती पाहता सन २०२० या वर्षात १६ मातांचा मृत्यू झाला आहे. काहींचा मृत्यू गर्भावस्थेत तर काहींचा मृत्यू प्रसूती नंतर झाला आहे. उपचारासाठी उशीर केल्यामुळेही मृत्यू झाला असल्याची बाब पुढे आली आहे. सन २०२० या वर्षात गोंदिया जिल्ह्यातील १६ हजार ४७४ महिलांची प्रसूती झाली आहे. त्यात ४ हजार ३४८ महिलांची शस्त्रक्रिया करून प्रसूती करण्यात आली आहे, तर १२ हजार ११५ महिलांची सामान्य प्रसूती झाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील ११ महिलांची प्रसूती घरीच झाली आहे. कोरोनामुळेही एका महिलेचा मृत्यू झाला आहे. वर्षभरात १६ मातांचा मृत्यू झाला आहे. पाच मातांचा मृत्यू प्रसूतीसाठी रुग्णालयात आणत असताना रस्त्यात झालेला आहे. चार मातांचा मृत्यू गंगाबाई स्त्री रुग्णालयात झाला आहे. तीन महिलांचा मृत्यू गोंदियाच्या शासकीय महाविद्यालयात, अर्जुनी-मोरगावच्या ग्रामीण रुग्णालयात एक तर गोंदियातील तीन खासगी रुग्णालयात प्रत्येकी एक अशा तीन मातांचा मृत्यू झाला आहे.

बॉक्स

जून महिन्यात सर्वाधिक मृत्यू

गोंदिया जिल्ह्यात वर्षभरात १६ मातांचा मृत्यू झाला. त्यात फेब्रुवारी, मार्च व ऑगस्ट या तीन महिन्यांत एकही मातेचा मृत्यू झाला नाही. परंतु जून महिन्यात सर्वाधिक चार मातांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी महिन्यात एक, एप्रिल महिन्यात दोन, मे महिन्यात एक, जुलै महिन्यात दोन, सप्टेंबर महिन्यात दोन, ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात प्रत्येकी एक अशा दोन तर डिसेंबर महिन्यात दोन मातांचा मृत्यू झाला आहे.

बॉक्स

उपचाराअभावी होतोय मृत्यू

आरोग्य संस्थेतच प्रसूती करा असा शासनाचा आग्रह असतो. आरोग्य संस्थेतच प्रसूती करण्याची इच्छा लोकांचीही असते. परंतु आरोग्य संस्थेत प्रसूती करण्यासाठी नेतांना नातेवाइकांकडून उशीर होत असल्यामुळे गोंदियातील जिल्हा महिला रुग्णालयापर्यंत त्या गर्भवतींना आणेपर्यंत उशीर होतो. परिणामी उपचाराअभावी वाटेतच महिलांचा मृत्यू होत आहेत.

कोट

ग्रामीण भागातील रुग्ण वेळेत जिल्हा रूग्णालयातपर्यंत पोहचत नाही. घरून निघायला उशीर होतो. प्राथमिक आरोग्य केंद्रात सामान्य प्रसूतीची वाट पाहण्यात अनेकांचा वेळ जातो. परिणामी योग्यवेळी गर्भवतींना उपचार मिळत नसल्याने मातामृत्यूची संख्या वाढते.

डॉ. सायास केंद्रे

स्त्री रोगतज्ज्ञ, गोंदिया

बॉक्स

जिल्ह्यात महिनानिहाय प्रसूती व मातामृत्यूची आकडेवारी

महिना एकूण प्रसूती सीजर नॉर्मल मृत्यू

जानेवारी १४६१ ३३९ ११२०

फेब्रुवारी ११८८ २२३ ९६४

मार्च १२६० ४७४ ७८६

एप्रिल ११४९ २८१ ८६८

मे १२७६ ३५१ ९२५

जून १२१० ३४६ ८६३

जुलै १३२८ ४०७ ९२१

ऑगस्ट १५२१ ३६१ ११६०

सप्टेंबर १४९८ ३४६ ११५०

ऑक्टोंबर १५९० ३९४ ११९५

नोव्हेंबर १५२५ ३८८ ११३५

डिसेंबर १४६८ ४३८ १०२८