शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

१५ हजार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 05:00 IST

तालुक्यात वर्ग १ ली ते १२ पर्यंत शिक्षण देणाऱ्या एकूण १५० शाळा आहेत. यात जिल्हा परिषदेच्या १०५ शाळांचा समावेश आहे. २ जि.प.माध्यमिक शाळा खासगी अनुदानित आहे. ६ स्वतंत्र उच्च माध्यमिक शाळा असून यामध्ये विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालय जास्त आहेत. २ शासकीय आणि २ खासगी अनुदानित माध्यमिक शाळा आहेत. ४ प्राथमिक शाळा खासगी अनुदानित आहेत.

गृहभेटी दरम्यान अनेक समस्या : तालुक्यात ऑनलाईन शिक्षणाला अपयशलोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : कोवीड-१९ च्या संसर्गाच्या भीतीपोटी मार्च महिन्यापासून बंद पाडण्यात आलेले शाळा-महाविद्यालय अद्यापही विद्यार्थ्यांसाठी उघडण्यात आलेले नाही. त्यामुळे कोरोना संकटाचा सर्वात मोठा फटका शैक्षणिक क्षेत्रावर पडला आहे. सालेकसा सारख्या आदिवासी व मागासलेल्या तालुक्यात ऑनलाईन सह इतर कोणत्याही पर्यायांना अध्यापन कार्यात यश मिळत नसल्याने तालुक्यातील १५ हजार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्ग लागण्याची प्रतीक्षा आहे. एखाद्या शिक्षकाला कोणताही विद्यार्थी समोर भेटला की सर शाळा केव्हा सुरु होणार? हा एकच प्रश्न विचारला जात आहे.नवीन शैक्षणिक सत्राला ३ महिने झाले असून यापुढेही शाळा केव्हा सुरु होतील याबद्दल नेमके कोणीच सांगू शकत नाही. दरम्यान या ३ महिन्यांत शासनाने ‘शाळा बंद, पण शिक्षण सुरु’ ही संकल्पना मांडत मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवण्याचे ठरविले. शाळा आणि संस्थांनी यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आणि विद्यार्थ्यांना शिक्षकांसोबत ऑनलाईन जोडण्याचे सर्वतोपरी उपाय केले. परंतु तालुक्यात ऑनलाईन शिक्षण पद्धतीला १० टक्केही यश आले नाही. एक तर विद्यार्थ्यांना स्मार्टफोनची सोय त्यानंतर नेटवर्क आणि रिचार्ज मारण्याची समस्या सतत पाठलाग करीत आहे. त्यामुळे बालक-पालक-शिक्षक आणि चालक सगळेच हतबल झालेले आहेत. अशात शाळेत प्रत्यक्ष वर्ग भरवून सुरळीत शिक्षण देण्याशिवाय मार्ग सापडत नाही.तालुक्यात वर्ग १ ली ते १२ पर्यंत शिक्षण देणाऱ्या एकूण १५० शाळा आहेत. यात जिल्हा परिषदेच्या १०५ शाळांचा समावेश आहे. २ जि.प.माध्यमिक शाळा खासगी अनुदानित आहे. ६ स्वतंत्र उच्च माध्यमिक शाळा असून यामध्ये विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालय जास्त आहेत. २ शासकीय आणि २ खासगी अनुदानित माध्यमिक शाळा आहेत. ४ प्राथमिक शाळा खासगी अनुदानित आहेत. तसेच ८ इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंट शाळा आहेत. जि.प.च्या प्राथमिक शाळांमध्ये तालुक्यातील ६ हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.९४६ विद्यार्थी जि.प.च्या माध्यमिक शाळांमध्ये असून खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळामध्ये एकूण ४७९५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. स्वतंत्र अस्तीत्वात असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात ७५० च्या जवळपास विद्यार्थी समाविष्ट आहेत. खासगी प्राथमिक शाळेत ३०० आणि कॉन्व्हेंटमध्ये १५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.परंतु यासर्व विद्यार्थ्यांचे अध्यापन कार्य रखडले असून पालक मुलांच्या शिक्षणाबाबत चिंतेत पडले आहे. जि.प.च्या शाळांमध्ये शिकणारे ९० ते ९५ टक्के बालके गरीब मजूर वर्गातील घरची असून त्यांना अ‍ॅँड्रॉईड मोबाइल फोन हाताळणे शक्य नाही. ५ टक्के बालकांनी मोबाइलची सोय केली तरी या तालुक्यात नेटवर्कची मोठी समस्या असून नेटवर्कसह अनेक आवाहने उभी ठाकली आहे.दरम्यान माध्यमिक शाळांच्या शिक्षकांनी गृहभेटीतून अध्यापन कार्य चालविण्याचा उपक्रम सुरु केला. परंतु या उपक्रमाला ही वांछीत यश मिळताना दिसत नाही. कारण की प्रत्येक शिक्षकाला प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी जावून शिक्षणाचे धडे देणे एवढे सोपे नाही. त्यातच गावातील एकूण विद्यार्थ्यांना एकाच स्थळी बोलावणे सुद्धा अशक्य व धोक्याचे सुध्दा आहे. अशात शिक्षकांनी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्याना गृहभेटीतू अध्यापनाच्या प्रवाहात ठेवण्याचा प्रयत्न करुन बोर्डाच्या परीक्षेसाठी मानसिकरित्या सज्ज ठेवण्याचा प्रयत्न चालविला आहे. परंतु यामध्ये दररोज प्रत्येक विषयाचे अध्यापन देणे प्रत्येक मुलापर्यंत पोहचणे त्यांना दररोज गृहकार्य देणे व ते तपासणे यात सातत्य ठेवण्यात मोठया अडचणी येत आहेत. आश्रम शाळांच्या शिक्षकांना तर गृहभेट उपक्रम आणखी मोठया अडचणीचे आहेत.कारण की या शाळांमध्ये येणारे विद्यार्थी वेगवेगळ््या गावचे आहेत. तसेच डोंगराळ भागात राहणारे व जंगलातील गावातले असून शिक्षकांना गृहभेट ही करणे शक्य नसते. या सर्वात १ ली व २ रीच्या विद्यार्थ्यांना तर प्रत्यक्ष वर्गाशिवाय इतर कोणतेच उपाय करता येत नाही. अशात आपले सरकार ऑनलाईन शिक्षण महाराष्ट्रात सुरळित असल्याचा गवगवा करीत असला तरी तालुक्यात मात्र त्याचा दावा सपशेल फोल ठरताना दिसत आहे.‘शाळेतील जेमतेम १० टक्के विद्यार्थ्यांनी स्मार्टफोनची व्यवस्था केली असली तरी पालक हा मोलमजुरी करणारा असून आॅनलाइन अभ्यास करण्यासाठी नेट पॅक मारत राहणे अशक्य असते. अशात ऑनलाइन शिक्षणासाठी अनेक समस्या उद्भवत असतात.मनोहर कटरे, मुख्याध्यापक, जि.प.डिजीटल शाळा, बोदलबोडीकोरोना काळात शाळा बंद असल्या तरी विद्यार्थी शिक्षणापासून पूर्ण वंचित राहू नये म्हणून शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनात काही शिक्षक स्वयंस्फूर्त गृहभेटीतून अध्यापनाचे सातत्य कायम ठेवण्याचे प्रयत्न करीत आहे. हे फार मोलाचे ठरत आहे.एस.जी.वाघमारे, गटशिक्षणाधिकारी,पं.स.सालेकसा

टॅग्स :onlineऑनलाइनEducationशिक्षण