लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाºया जिल्ह्यातील १५ हजारावर शेतकऱ्यांचे धानाचे १०० कोटी रुपयांचे चुकारे मागील दोन महिन्यापासून थकले आहेत. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असून खरीप हंगाम तोंडावर असताना तयारी कशी करायची अशी समस्या त्यांच्यासमोर निर्माण झाली आहे.जिल्ह्यात खरीप हंगामात एकूण ७० शासकीय धान खरेदी केंद्रावरुन हमीभावानुसार धान खरेदी करण्यात आली. ३१ मार्चपर्यंत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने ३५ लाख क्विंटल धानाची खरेदी केली.जवळपास ६०० कोटी रुपयांची धान खरेदी करण्यात आली असून यापैकी ५०० कोटी रुपयांचे चुकारे करण्यात आले आहे. मात्र मार्च महिन्यात सर्वत्र कोरोनाचा शिरकाव झाल्याने सर्व व्यवहार ठप्प पडले. त्यामुळे शासनाकडून निधी प्राप्त होण्यास अडचण निर्माण झाली. परिणामी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या १५ हजार शेतकऱ्यांचे १०० कोटी रुपयांचे धानाचे चुकारे थकले आहेत.चुकाºयाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जात असल्याने शेतकरी चुकारे जमा झाले का म्हणून मागील दोन महिन्यापासून बँकेच्या पायऱ्या झिजवित आहेत. मात्र प्रत्येकवेळी त्यांना निराश होवूनच परतावे लागत आहे.खरीप हंगाम सुरू होण्यास केवळ महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे. अशात हंगामपूर्व मशागतीची कामे आणि खते, बियाणांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे.यासाठीच शेतकऱ्यांनी शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची लवकर विक्री केली. मात्र आता त्यांना त्यांच्यात शेतमालाची रक्कम वेळेवर मिळत नसल्याने त्यांची कोंडी झाली आहे.यासंदर्भात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता शासनाकडे निधीची मागणी केली आहे. येत्या आठवडाभरात निधी प्राप्त होण्याची शक्यता आहे. निधी प्राप्त होताच तो शेतकºयांच्या खात्यावर जमा केला जाईल असे सांगितले.२६ लाख क्विंटल धानाची भरडाई पूर्णजिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत खरीप हंगामात एकूण ३५ लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. खरेदी केलेल्या धानाची राईस मिलर्सशी करार करुन भरडाई करुन तांदूळ शासनाकडे जमा केला जातो. यापैकी आत्तापर्यंत २६ लाख क्विंटल धानाची भरडाई पूर्ण झाल्याची माहिती आहे.रब्बीत १५ लाख क्विंटल धान खरेदीचा अंदाजजिल्ह्यात रब्बी हंगामात एकूण ३५ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली होती. सध्या रब्बी हंगामातील धानाची कापणी आणि मळणी सुरू आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी ७० शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदी केली जाणार आहे. रब्बीत जवळपास १५ लाख क्विंटल धान खरेदी होण्याचा अंदाज जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने वर्तविला आहे.
१५ हजार शेतकरी चुकऱ्यांच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 05:00 IST
जवळपास ६०० कोटी रुपयांची धान खरेदी करण्यात आली असून यापैकी ५०० कोटी रुपयांचे चुकारे करण्यात आले आहे. मात्र मार्च महिन्यात सर्वत्र कोरोनाचा शिरकाव झाल्याने सर्व व्यवहार ठप्प पडले. त्यामुळे शासनाकडून निधी प्राप्त होण्यास अडचण निर्माण झाली. परिणामी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या १५ हजार शेतकऱ्यांचे १०० कोटी रुपयांचे धानाचे चुकारे थकले आहेत.
१५ हजार शेतकरी चुकऱ्यांच्या प्रतीक्षेत
ठळक मुद्दे१०० कोटी रुपयांची गरज : शासनाकडून निधी न मिळाल्याने अडचण