शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

१.३५ हजारांची दारू व सडवा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 05:00 IST

अवैधरीत्या दारू काढून तिची विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी आपली कंबर कसली असून, सातत्याने धाडसत्र राबविले जात आहे. अशातच पोलिसांनी मंगळवारी (दि. ९ मार्च) दुपारी २ ते रात्री ८ वाजताच्या दरम्यान ७ दारूविक्रेत्यांवर धाड घालून त्यांच्याकडील एक लाख ३५ हजार ३५० रुपयांचा माल जप्त केला. 

ठळक मुद्देतिरोडा पोलिसांची कारवाई : ७ दारू विक्रेत्यांना दिला दणका

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : अवैधरीत्या दारू काढून तिची विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी आपली कंबर कसली असून, सातत्याने धाडसत्र राबविले जात आहे. अशातच पोलिसांनी मंगळवारी (दि. ९ मार्च) दुपारी २ ते रात्री ८ वाजताच्या दरम्यान ७ दारूविक्रेत्यांवर धाड घालून त्यांच्याकडील एक लाख ३५ हजार ३५० रुपयांचा माल जप्त केला.      महाशिवरात्रीचा उत्सव शांततेत पार पडावा याकरिता राबविण्यात आलेल्या धाडसत्रात छाया सोविंदा बरेकर (रा. सिली) हिच्या घरातून २७ प्लास्टिक चुंगडीत ५४० किलो सडवा, १० लीटर मोहा दारू व दारू काढण्याचे साहित्य  असा एकूण ४५ हजार ४५० रुपयांचा माल, संजय सोविंदा बरेकर (रा. सिली) याच्या घरातून ५८० किलो सडवा, १० लीटर मोहा दारू व दारू काढण्याचे साहित्य असा एकूण ४८ हजार ६५० रुपयांचा माल, शांता बाबूराव बरीयेकर (रा. रविदास वॉर्ड) हिच्या घरातून झडतीत २० प्लास्टिक चुंगडीत २०० किलो सडवा असा १६ हजार रुपयांचा माल, पूर्णा प्रल्हाद तांडेकर (रा. रविदास वॉर्ड) हिच्या घरातून १० प्लास्टिक चुंगडीत २००  किलो सडवा, १० लिटर मोहा दारू व दारू काढण्याचे साहित्य असा एकूण १८ हजार २५० रूपयांचा माल, शेवंता अनिल उके (रा. ठाणेगाव) हिच्या घरातून १५ लीटर मोहा दारू असा  एक हजार ५०० रुपयांचा माल, नाशिया वासनिक (रा. कोडेलोहारा) हिच्या घरातून २० लीटर मोहा दारू असा एकूण चार हजार रुपयांचा माल तर धर्मराज उरकूडा भोयर (रा. नवेगाव खुर्द) याच्या घरातून १५ लीटर मोहा दारू असा एक हजार ५०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. अशा प्रकारे ७ ठिकाणी घातलेल्या धाडीत एकूण  एक लाख ३५ हजार ३५० रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कार्यवाही उप विभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश पारधी, सपोनि ईश्वर हनवते, महिला उपनिरीक्षक राधा लाटे, हवालदार साठवणे, दामले, शिपाई श्रीरामे, बर्वे, बांते, भांडारकर, उके, दमाहे,  शेख यांनी केली.

 

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस