शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

नक्षलवाद्यांच्या २० वर्षात १३४ हिंसक कारवाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 10:06 PM

नक्षलवाद्यांचे रेस्ट झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात दहशतवाद्यांसारखे नक्षलवाद्यांचेही कृत्य हिंसक झाले आहेत. गोंदिया जिल्हा निर्मितीपासून आजपर्यंत २० वर्षांच्या काळात जिल्ह्यात १३४ कारवाया झाल्या आहेत.

ठळक मुद्दे३३ सामान्य नागरिकांचाही मृत्यू : २९ चकमकीत २२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे बलिदानजागतिक दहशतवाद विरोधी दिन विशेष

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नक्षलवाद्यांचे रेस्ट झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात दहशतवाद्यांसारखे नक्षलवाद्यांचेही कृत्य हिंसक झाले आहेत. गोंदिया जिल्हा निर्मितीपासून आजपर्यंत २० वर्षांच्या काळात जिल्ह्यात १३४ कारवाया झाल्या आहेत.त्यात नक्षलवादी आणि पोलिसांच्या झालेल्या चकमकीत आतापर्यंत जिल्ह्यातील २२ अधिकारी-कर्मचारी शहीद झाले आहेत. तर ३३ सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती नक्षल विरोधी अभियान पथकाकडून मिळाली.गोंदिया जिल्ह्याची निर्मिती १ मे १९९९ रोजी झाली. तेव्हापासून सन २०१८ च्या अखेर पर्यंत जिल्ह्यात १३४ कारवाया झाल्या आहेत. २०१२ मध्ये नक्षल्यांकडून सर्वाधीक १७ कारवाया करण्यात आल्या. त्यानंतर सन २००६ मध्ये १५ कारवाया, सन २००३ मध्ये १३, सन २०१८ व सन २००९ मध्ये प्रत्येकी १०, सन २०१० व सन २०११ मध्ये प्रत्येकी नऊ, सन २००२ मध्ये आठ, सन २००७ मध्ये सहा, सन २००१ मध्ये पाच, सन २००४, सन २०१३ व सन २०१७ मध्ये प्रत्येकी चार, सन २००८, सन २०१४ व सन २०१६ या वर्षात प्रत्येकी तीन, सन २००० व सन २०१५ या दोन्ही वर्षात प्रत्येकी दोन तर सन १९९९ मध्ये एक कारवाई करण्यात आली आहे.आपल्या मागण्या पूर्ण करवून घेण्यासाठी बळजबरीने अत्यंत भिती दाखवून नक्षलवाद्यांकडून हिंसाचार केला जातो. जाळपोळ, अपहरण व खून केले जाते. लोकशाहीच्या विरोधात कामे करून विकासात अडथळा आणण्याचे काम केले जाते. पोलीस खबºयाच्या संशयावरून अनेकांचा खून करण्यात आला. महाराष्टÑात गडचिरोली व गोंदिया या दोन जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवाया पाहायला मिळतात. अवघ्या काही दिवसांपूर्वीच गडचिरोली येथे वाहनांची जाळपोळ करून पोलीस वाहनाला स्फोटाने उडविले. त्यात १५ जवान शहीद झाले. शासन गरीब आदिवासी जनतेच्या हितासाठी अनेक योजना राबविण्यासाठी पुढाकार घेत आहे.तर विकासाच्या कामात अडथळा आणण्याचे काम नक्षलवाद्यांकडून केले जाते. नक्षलवादी व पोलीस यांच्या मधात असलेल्या आदिवासी जनतेला नेहमी दहशतीच्या सावटातच जीवन जगावे लागते. ‘हा कहे तो मॉ मरे, ना कहे तो बाप’ अशी स्थिती आजही नक्षलग्रस्त भागातील गावात आहे. मागील काही दिवसांपासून नक्षलवादी पोलिसांच्या समोर आत्मसमर्पण करीत असल्याने नक्षल चळवळीला चांगलाच हादरा बसला आहे.जाळपोळीच्या ३४ घटनानक्षलवाद्यांनी केलेल्या हिंसक कारवायांचा आढावा घेतला असता आतापर्यंत २२ अधिकारी-कर्मचारी शहीद झाले. ३३ नागरिकांना प्राणास मुकावे लागले. त्यात १७ लोकांचा खून करण्यात आला. चौघांवर खुनाचा प्रयत्न करण्यात आला. लूटपाटच्या १० घटना, जबरी चोरीचे दोन गुन्हे, जाळपोळच्या ३४ घटना नमूद आहेत. २९ चकमक झाल्या असून ३८ इतर गुन्हे केले आहेत.तंटामुक्त मोहिमेमुळे पोलिसांना मदतआदिवासी नक्षलग्रस्त गावात नक्षलवाद्यांची माहिती काढण्यासाठी जाणाºया पोलिसांना लोक मदत करीत नसतात. पोलीस गावात गेले की नागरिक आपल्या घरची दारे बंद करतात. परंतु महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री दिवंगत आर.आर. पाटील यांनी आणलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेमुळे पोलीस व आदिवासी जनता यांच्यातील दुरावा संपला. जे आदिवासी नक्षलवाद्यांना जेवण देत होते तेच आदिवासी तंटामुक्त मोहीमेमुळे पोलिसांना माहिती देऊ लागले. त्यामुळे नक्षलवाद्यांनी या तंटामुक्त मोहिमेचा जोरदार विरोध केला. तंटामुक्त मोहीम ही आदिवासी जनता व पोलीस यांच्यात समन्वय साधणारा दुवा ठरली.सन्मानाचे जीवन जगण्यासाठी पुढे यानक्षल्यांचे जीवन खडतर आहे. त्यात पोलिसांच्या गोळीवर त्यांचे नाव लिहिले असून हे अमूल्य निरर्थक जाणार आहे. त्यामुळे हे जीवन सन्मानाचे जगण्यासाठी हिंसक नक्षलवादाचा मार्ग सोडून नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण योजनेचा लाभ घ्यावा.- विनीता शाहू, पोलीस अधीक्षक गोंदिया.