शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील १३३ मत्स्यव्यवसाय संस्था बंद पडण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 16:05 IST

परिणय फुके यांनी सभागृहाचे वेधले लक्ष : ६४ तलाव उपलब्ध करून देणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदियाभंडारा जिल्ह्यातील १३३ मत्स्यव्यवसाय संस्था बंद पडण्याच्या स्थितीत असल्याने त्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊन त्यांना गावोगावी भटकावे लागत आहे. त्यामुळे मत्स्यव्यवसाय वाढविण्यासाठी शासन काही कार्यवाही आणि उपाययोजना करणार आहे का, असा प्रश्न आ. परिणय फुके यांनी सभागृहात उपस्थित केला. यावर उत्तर देताना मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी ६४ तलाव मत्स्यव्यवसायासाठी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती दिली.

आ. डॉ. परिणय फुके यांनी सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायावर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाबाबत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील १३३ मत्स्यव्यवसाय संस्था बंद पडण्याच्या स्थितीत असल्याने या मत्स्यव्यवसायावर अवलंबून असलेल्या लाखो कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊन त्यांना रोजगारासाठी गावोगावी भटकावे लागत असल्याची बाब डिसेंबर २०२४ मध्ये निदर्शनास आली. हा प्रश्न डॉ. फुके यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सविस्तर उत्तर दिले. मत्स्यव्यवसाय विभागाकडील ६४ तलाव ३ जुलै २०१९ च्या शासन निर्णयानुसार मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना मासेमारीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. १४४ तलाव सहकारी संस्थेस प्राधान्याने मासेमारीसाठी ठेक्याने देण्यात आले असल्याचे सांगितले.

९ संस्थांना साहित्य पुरवठागोंदिया व भंडारा जिल्ह्यात बांध पद्धतीद्वारे पावसाळ्यात मत्स्यप्रजनन करून मत्स्यबीज निर्मिती करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन दिले जाते आहे. त्यासाठी वर्ष २०२२-२३ मध्ये बांध प्रजननासाठी उपयोगी असणाऱ्या साहित्याचा पुरवठा ९ संस्थांना मानव विकास कार्यक्रमांतर्गत ८.९७ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला होता, अशीही माहिती राणे यांनी सभागृहात दिली.

२१ लाख रुपयांची तरतूदजिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना मासेमारीसाठी आवश्यक असणारे मासेमारी जाळे आणि नौका अनुदानावर खरेदीसाठी मासेमारी साधनांच्या खरेदीवर अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत ५० टक्के अनुदानाने स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी २०२४-२५ या आर्थिक वर्षात सर्वसाधारण योजनेअंतर्गत २१ लाख रुपयांची तरतूद जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अर्थसंकल्पित असून त्याचा लाभ गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील मच्छीमारांना होणार आहे, असे सांगितले.

टॅग्स :Parinay Fukeपरिणय फुकेgondiya-acगोंदियाbhandara-acभंडारा