शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
2
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
3
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
4
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
6
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
7
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
8
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
9
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
10
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
11
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
12
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
13
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
14
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
15
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
16
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
17
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
18
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
19
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
20
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी

गर्भवती महिलांना १३०० रूपयांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:51 AM

गरीब गर्भवतींना जीवनदान देणारे बाई गंगाबाई रुग्णालय सध्या विविध समस्यांनी घेरले आहे.

बीजीडब्ल्यूतील प्रकार : शस्त्रक्रियेसाठी औषधी बाहेरून आणण्याचा सल्लानरेश रहिले । लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गरीब गर्भवतींना जीवनदान देणारे बाई गंगाबाई रुग्णालय सध्या विविध समस्यांनी घेरले आहे. पैसे नाही म्हणून खासगी रूग्णालयात प्रसूती न करता गंगाबाईची कास धरणाऱ्या महिलांना आता प्रसूतीसाठी १३०० रूपयांची औषधी खासगी मेडीकल मधून खरेदी करावी लागत आहे. औषधी आणल्याशिवाय बाई गंगाबाईस्त्री रूग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलांची शस्त्रक्रियाच होत नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय गोंदिया जिल्ह्यातील गरिब गर्भवती महिलांसाठी आधार देणारे केंद्र आहे. गरीबीमुळे प्रसूती खासगी रूग्णालयात करण्यास असमर्थ ठरणाऱ्या महिलांना बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात दाखल केले जाते. परंतु, या रूग्णालयात शासनाकडून औषधचा पुरवठा होत नसल्याने सीजर करणाऱ्या महिलांच्या नातेवाईकांना १२०० ते १३०० रूपयापर्यंतची औषधी बाहेरून आणण्यास भाग पाडले जाते. बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात दररोज २० सामान्य तर ८ शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती केली जाते. ज्याना कुणाचा आधार नाही. गरिबीत जीवन जगणाऱ्या महिलांना बाई गंगाबाई रुग्णालयाचा मोठा आधार आहे. परंतु, औषधे नसल्यामुळे त्यांच्यावर १३०० रूपयांचा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. या संदर्भात काही नातेवाईक आरोग्य प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त करीत आहेत. परंतु ,औषधी उपलब्ध करण्याकडे आरोग्य विभागाने दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. उधार उसनवारी करून गर्भवती महिलांचे नातेवाईक बाहेरून कॅटगट नंबर १, कॅटगट नंबर २, वायक्रीन नंबर -१, एथीलॉन २-०, बीटॅडीन, एडीके ही औषधे बाहेरून आणत आहेत. तर सामान्य प्रसूतीसाठी कॅटगट नंबर १, कॅटगट नंबर २, बीटॅडीन, मिझोपॉस्ट ही औषधीही उपलब्ध नाही. त्यामुळे प्रसूतीसाठी येणाऱ्या गर्भवतींच्या नातेवाईकांमार्फत खासगी मेडीकलमधून ही औषधी आणण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. गरीब रूग्णांच्या नातेवार्इंकांना आर्थिक भूर्दंड बसत आहे. औषध खरेदीसाठी निधीची तरतूद करा बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात औषध उपलब्ध नसल्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून औषधे आणण्यास सांगितले जाते. परिणामी अडचणीत सापडलेल्या रूग्णांचे आर्थिक शोषण होत आहे. त्यामुळे औषधांच्या खर्चाची पूर्तत: रूग्ण कल्याण निधीतून करण्यात यावी, अशी मागणी अर्जुनी-मोरगाव विधानसभा युवक काँग्रेसचे महासचिव डॉ. विवेक मेंढे यांनी केली आहे. सीबीसी मशीन बंदच आठवडाभरापासून बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयाची सीबीसी मशीन बंद आहे. केटीएसची देखील सीबीसी मशीन बिघडलेली आहे. यासंदर्भात वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाताही लक्ष देत नसल्याचा आरोप होत आहे. केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या चार सीबीसी मशीन आहेत. यापैकी ती मशीन दिड वर्षापासून बंद आहेत. तर एक मशीन आता बंद झाली आहे. त्यामुळे हिमोग्लोबीन, प्लेटलेट्स व यूबीसी काऊंट करण्यासाठी रूग्णांना खासगी रूग्णालयात धाव घ्यावी लागत असल्याचे चित्र आहे.