देवरी: दुकानात कुलर मध्ये पाईपने पाणी भरत असताना करंट लागून एका तेरा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही घटना देवरी येथे मंगळवार दि.3 रोजी सायंकाळी आठ वाजता घडली. मुसा उर्फ सुफियान इम्रान रजा असे १३ वर्षीय मृतक बालकांचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार मंगळवारला साप्ताहिक बाजार असल्याने मुसा उर्फ सुफियान आपल्या मामाच्या दुकानात मेमन चिकन सेंटर येथे होता. रात्री ८ वाजता दुकान बंद करतेवेळी कुलर मध्ये पाईपने पाणी भरत असताना त्याला कुलरचा जोरदार शॉक लागला. विजेच्या धक्क्याने खाली पडल्यावर त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु डॉक्टरने त्याला मृत घोषीत केले.१३ वर्षीय बालकाचा विजेच्या शॉक ने मृत्यू झाल्याने देवरी येथे हळहळ व्यक्त होत आहे.या प्रकरणी देवरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद दाखल केली असून पुढील तपास हवालदार ग्यानीराम करंजेकर करीत आहेत.