शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
2
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
3
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
4
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
5
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
6
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
7
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
8
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
9
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
10
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
11
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
12
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
13
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव
15
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
16
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
17
‘मित्रांनो, क्षमा करा; मुंबईत आता आणखी लोकांचे स्वागत नाही’
18
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
19
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
20
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ

शेतकऱ्यांचे अर्ज २८ हजार पंचनामे केवळ २१५०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 6:00 AM

जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात १ लाख ९१ हजार हेक्टरवर धान पिकाची लागवड करण्यात आली आहे.खरीपात जिल्ह्यातील ७० हजार शेतकºयांनी पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत हप्ता भरुन पिकांचा विमा उतविला होता. यंदा पीक परिस्थिती चांगली असल्याने भरघोस उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविला जात होता. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर देखील समाधानाचे भाव होते.

ठळक मुद्देपीक विमा कंपनीकडे मनुष्यबळाचा अभाव : तक्रार अर्जात दररोज भर, मदत मिळण्यास लागणार विलंब

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे हजारो हेक्टरमधील धानपिकांचे नुकसान झाले.या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश शासनाने कृषी,महसूल विभाग आणि पीक विमा कंपन्यांना दिले. पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांपैकी २८ हजार शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे करण्यात यावे,यासाठी विमा कंपनीकडे अर्ज केले.मात्र विमा कंपनीने आत्तापर्यंत केवळ २१५० शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तयार केले आहे.परिणामी उर्वरित शेतकºयांच्या नुकसानीचे पंचनामे केव्हा होणार आणि त्यांना नुकसान भरपाई केव्हा मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात १ लाख ९१ हजार हेक्टरवर धान पिकाची लागवड करण्यात आली आहे.खरीपात जिल्ह्यातील ७० हजार शेतकºयांनी पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत हप्ता भरुन पिकांचा विमा उतविला होता. यंदा पीक परिस्थिती चांगली असल्याने भरघोस उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविला जात होता. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर देखील समाधानाचे भाव होते. मात्र ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे यावर पाणी फेरल्या गेल्या. दिवाळीपूर्वी अनेक शेतकऱ्यांनी धानाची कापणी करुन ठेवली होती. याच दरम्यान पाऊस झाल्याने धानाच्या कडपा भिजल्याने धान पाखड झाला. तर काही प्रमाणात धानाला कोंबे फुटली परिणामी शेतकऱ्यांनी घेतलेली मेहनत मातीमोल झाली.बºयाच शेतकऱ्यांनी बँकेतून कर्जाची उचल करुन आणि उधार उसणवारी करुन तर काहींनी पत्नीचे दागिने गहाण ठेऊन खरीपाची तयारी केली होती. धानाची विक्री करुन कर्जाची परतफेड करु असे स्वप्न शेतकरी पाहत होता.मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे हे स्वप्न सुध्दा भंगल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता त्यांचे नुकसान झाल्यानंतर त्यांनी पीक विमा कंपनीकडे अर्ज केले.जवळपास २८ हजारावर शेतकऱ्यांनी कृषी विभाग आणि पीक विमा कंपनीकडे अर्ज केले. कृषी विभागाने पंचनामे पूर्ण केले आहे. तर पीक विमा कंपनीचे पंचनामे होणे अद्यापही बाकी आहे. २८ हजार अर्जांपैकी आतापर्यंत केवळ २१५० शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहे.विमा कंपनीने प्रत्त्येक तालुक्यात एका प्रतिनिधीची नियुक्ती केली आहे.त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्यास मनुष्यबळ कमी पडत असल्याने पंचनामे करण्यास उशीर होत असल्याची माहिती आहे.मात्र शेतकऱ्यांच्या अर्जांची संख्या पाहता पंचनामे केव्हा होणार आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई केव्हा मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.कृषी विभागाचे पंचनामे अंतीम टप्प्यातपरतीच्या पावसामुळे धानपिकाच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी आणि महसूल विभागाच्या यंत्रणेकडून युध्दपातळीवर करण्यात आले. यात एकूण १९ हजार ३८६ हेक्टरमधील धान पिकाचे नुकसान झाले आहे. यात ९ हजार ५३३ हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्केच्यावर तर ९ हजार ८५३ हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्केच्या आत नुकसान झाले आहे. यामुळे ३२ हजार ७९८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरूच असल्याने यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदकिशोर नयवाड यांनी सांगितले.तलाठी,कृषी सेवकाची मदत घेण्याचे निर्देशपीक विमा कंपनीकडे मनुष्यबळाचा अभाव असल्याने परतीच्या पावसामुळे धान पिकाचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास उशीर होत आहे.त्यामुळे याचा फटका पीक विमाधारक शेतकऱ्यांना बसू शकतो.हीच बाब ओळखून शासनाने पीक विमा कंपन्याना तलाठी आणि कृषी सेवकांची मदत घेऊन पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे.८०७ गावातील शेतकऱ्यांना फटकागोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते. मात्र ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीचा पावसाचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील ८०७ गावातील शेतकऱ्यांना बसल्याचा अहवाल कृषी आणि महसूल विभागाने शासनाला पाठविला आहे.मदतीसाठी ३०० कोटी रुपयांची गरजपरतीच्या पावसामुळे धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.कमी कालावधीत पंचनामे पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे.त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट एकरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. यासाठी जवळपास ३०० कोटी रुपयांचा निधी लागण्याची शक्यता आहे.नुकसान भरपाई मिळण्यास तीन महिने लागणारज्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत पीक विमा काढला आहे. त्या शेतकºयांचे परतीच्या पावसामुळे नुकसान झाले आहे.धान पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तयार करण्याचे काम सुरू असून यानंतर नुकसानीचा अहवाल पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे नुकसान भरपाई मिळण्यास शेतकऱ्यांना किमान तीन महिने प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती