शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक ठरली, 'आघाडी'चे काही ठरेना; विरोधकांमध्ये एकी दिसेना, मतदान आले २० दिवसांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 13:09 IST

झेडपी निवडणुकीच्या निमित्ताने गोवा फॉरवर्ड, काँग्रेस व आरजीमध्ये एकीकडे आघाडीचे चर्चा सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : जिल्हा पंचायतीच्या मतदानासाठी अवघे २० दिवस राहिले असताना विरोधी पक्षांच्या नेत्यांची भूमिका कळत नाही. आघाडीची स्वप्ने बघणाऱ्या या पक्षांनी अद्याप उमेदवारच ठरवलेले नाहीत. त्यामुळे अशी दिरंगाई करणाऱ्या पक्षांवर लोक विश्वास ठेवतील का? असा प्रश्न आपचे नेते अॅड. अमित पालेकर यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी आपचे उमेदवार ठरले असून आमचे कामही सुरू झाल्याचे सांगितले.

झेडपी निवडणुकीच्या निमित्ताने गोवा फॉरवर्ड, काँग्रेस व आरजीमध्ये एकीकडे आघाडीचे चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे काही नेते एकमेकांवर आरोप करत आहेत. त्यामुळे आघाडी करू पाहणाऱ्या पक्षात गोंधळाचे वातावरण असून ते भाजपला कसा काय घडा शिकवणार? असा प्रश्न पालेकर यांनी उपस्थित केला.

कधी-कधी आघाडी न करता स्वतंत्रपणे लढणे योग्य ठरते. आघाडी म्हणजे परस्पर विश्वास आणि पारदर्शकता असणे महत्त्वाचे आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता आम्हाला आघाडी करू पाहणाऱ्या नेत्यांची स्पष्ट भूमिकाच दिसत नाही. आघाडी होण्याआधीच बिघाडीचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे लोकांचा या पक्षांवर किती विश्वास असेल हे सांगता येणार नाही, असेही पालेकर म्हणाले.

'बिघाडी'ची चर्चाच जास्त : अमित पालेकर

पालेकर पुढे म्हणाले, भाजप * सरकारला पराभूत करणे हाच आम आदमी पक्षाचा मुख्य उद्देश आहे. आम्ही राज्यात पर्याय निर्माण करण्यासाठी काम करत आहोत. मात्र, आघाडीतील अनिश्चितता, लांबणारी निर्णय प्रक्रिया हा चिंतेचा विषय आहे. आघाडी करण्यावरच अजून स्पष्टपणे शिक्कामोर्तब झालेला नाही. काही नेते आताच एकमेकांवर टीका करत आहेत. त्यामुळे बिघाडीची चर्चाच जास्त असून पुढील वाटचाल कशी असेल? असा उपरोधीक टोलाही पालेकर यांनी लगावला. आपने उमेदवार जाहीर करून कामही सुरू केले. लोकांचा आपवर पूर्ण विश्वास असल्याचे पालेकर यांनी नमूद केले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Goa Alliance Uncertain as Election Nears; Opposition Unity Lacking

Web Summary : With Panchayat elections nearing, opposition alliance talks stall. AAP criticizes delays, highlighting internal conflicts within Goa Forward, Congress, and RGP. AAP asserts readiness, questioning the opposition's ability to challenge BJP amidst disunity.
टॅग्स :goaगोवाLocal Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकZP Electionजिल्हा परिषदzpजिल्हा परिषदPoliticsराजकारण