युवक-युवतीची आत्महत्या
By Admin | Updated: February 3, 2016 02:56 IST2016-02-03T02:51:55+5:302016-02-03T02:56:42+5:30
फोंडा : पालवाडा-उसगाव येथील रश्मी नागेश गावडे (वय १७) या युवतीने सोमवारी सायंकाळी आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेला १२

युवक-युवतीची आत्महत्या
फोंडा : पालवाडा-उसगाव येथील रश्मी नागेश गावडे (वय १७) या युवतीने सोमवारी सायंकाळी आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेला १२ तास उलटण्यापूर्वीच याच भागातील विश्वनाथ मनोहर गावडे या १९ वर्षीय युवकाने मंगळवारी सकाळी आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याने उसगाव भागात खळबळ उडाली. दोन्ही घटनांचा परस्पर संबंध स्पष्ट झालेला नसला, तरी या आत्महत्या प्रेमप्रकरणातून झाल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, फोंडा पोलिसांकडून या संशयाला पुष्टी मिळू शकली नाही.
प्राप्त माहितीनुसार, रश्मी या नववीतील विद्यार्थिनीने सायंकाळी ४ ते ५.३0 वाजण्याच्या दरम्यान घरात कुणीच नसल्याचे पाहून दुपट्ट्याच्या साहाय्याने गळफास घेतला. तिचे आई-वडील घरी आल्यानंतर त्यांनी तातडीने तिला खाली उतरवून प्रथमोपचार केले व पिळये येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या घटनेची वार्ता काल, सोमवारी पालवाडा भागात पसरली होती. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असतानाच मंगळवारी सकाळी या युवतीच्या घरापासून सुमारे २00 मीटर अंतरावर राहाणाऱ्या विश्वनाथ गावडे या युवकाने आपल्या घरातच गळफास घेतल्याचे उघड झाले.
विश्वनाथ सकाळी उठला नसल्याने त्याच्या वडिलांनी त्याला हाका मारल्या असता, त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी विश्वनाथच्या खोलीचा दरवाजा तोडला असता, त्याने साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळले.
उत्तरीय तपासणीनंतर फोंडा पोलिसांनी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. निरीक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हरीष नाईक व गिरीश पाडलोस्कर तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)