शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

देशसेवेत तरुणांनी योगदान द्यावे : दामू नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 11:57 IST

डिचोली येथे 'नशामुक्त भारत नमो रन'मध्ये ३३०० युवकांचा सहभाग : काँग्रेस खोटे आरोप करत समाजात विष पसरवतेय : भाजपची टीका

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात भारत वैभवाच्या शिखरावर पोहोचला असताना काँग्रेस कल्याणकारी व देशहिताच्या प्रयत्नांना खो घालत आहे. खोटे आरोप करून विष पेरत आहेत. शेजारील राष्ट्रांनाही देशाची प्रगती बघवत नाही, अशा स्थितीत तरुणांनी व्यसनमुक्तीचा ध्यास घेऊन नशामुक्त भारत निर्माण करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केले.

डिचोली येथे भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चातर्फे वाळशी येथे नशामुक्त भारत अभियानांतर्गत नमो रनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये यावेळी यास वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धेत तब्बल ३३०० युवक-युवती, नागरिकांनी सहभाग घेतला.

व्यासपीठावर खासदार सदानंद तानावडे, माजी खासदार नरेंद्र सावईकर, डिचोलीचे आमदार चंद्रकांत शेट्ये, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, उत्तर गोवा भाजपध्यक्ष दयानंद कार्बोटकर, युवा अध्यक्ष तुषार केळकर, भाजपचे नेते सिद्धार्थ कुंकळ्ळकर, समीर मांद्रेकर, दीपक नाईक, सर्वांनंद भगत, राष्ट्रीय युवा नेत्या अर्पिता, अनिकेत चणेकर आदी उपस्थित होते. पहाटे साडेपाच वाजता दामू नाईक यांच्या हस्ते स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला. किरण नाईक यांनी सूत्रसंचालन केले. तुषार केळकर यांनी आभार व्यक्त केले.

आमदार प्रेमेंद्र शेट यांनी या नमो रनमध्ये सहभाग घेताना पाच किलोमीटर धावून आपण तंदुरुस्त असल्याचे दाखवून दिले. तर, एका गर्भवती महिलेचाही समावेश होता. दिव्यांग, युवा ज्येष्ठांनीही यात सहभाग घेतला. आमदार चंद्रकांत शेट्ये यांनी ही स्पर्धा खऱ्या अर्थाने यशस्वी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. आमदार प्रेमेंद्र शेट यांनीही नशामुक्त भारतचा संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार गोमंतकीयांनी केल्याचे स्पर्धेतून दिसल्याचे स्पष्ट केले.

सदानंद तानावडे यांनी नशामुक्त भारत नमो रनच्या माध्यमातून देशातील युवा व सर्व सामान्य जनतेला नशेपासून मुक्त करताना आदर्श भारत मातेची सेवा करण्याची प्रेरणा देण्याचा उद्देश आहे. नमो रनला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आमदार शेट्ये व शेट यांचे विशेष अभिनंदन केले.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण