दूधसागर धबधब्यात युवक बुडाला
By Admin | Updated: August 18, 2014 01:20 IST2014-08-18T01:09:58+5:302014-08-18T01:20:55+5:30
दूधसागर धबधब्यात युवक बुडाला

दूधसागर धबधब्यात युवक बुडाला
कुळे : सोनावली-कुळे येथील दूधसागर धबधब्यात इचलकरंजी-महाराष्ट्रातील शब्बीर मेसरी हा युवक रविवारी बुडाला. त्याचा अद्याप शोध लागला नाही. इचलकरंजी (महाराष्ट्र) येथील शब्बीर मेसरी हा अन्य १३ युवकांसह कुळे येथील दूधसागर धबधब्यावर सहलीकरिता आला होता. ते येथील धबधब्याचे नयनरम्य दृश्य न्याहाळत राहिले. या वेळी मेसरी याचा तोल गेल्याने तो सरळ धबधब्यात कोसळला आणि क्षणातच दिसेनासा झाला.
या ठिकाणी असलेल्या कुळे पोलीस स्थानकाच्या पोलिसांना या गटातील लोकांनी घटनेची माहिती दिली. पोलिसांनी त्यांना कुळे पोलीस स्थानकात जाऊन बुडाल्याची तक्रार करावयास सांगितले; परंतु रात्री उशिरापर्यंत त्या गटातील लोकांनी पोलीस स्थानकात तक्रार दिलेली
नाही. (प्रतिनिधी)