शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

नोकरीच्या शोधासाठी गोव्यात आलेल्या तरुणाची रेल्वेत आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2019 16:55 IST

नोकरी शोधण्यासाठी गोव्यात आलेल्या मूळच्या छत्तीसगड राज्यातील एका तरुणाने रेल्वेमध्ये गळफास लावून आत्महत्या केली आहे.

ठळक मुद्देनोकरी शोधण्यासाठी गोव्यात आलेल्या मूळच्या छत्तीसगड राज्यातील एका तरुणाने रेल्वेमध्ये गळफास लावून आत्महत्या केली आहे. अजय प्रदेशराम यादव (25) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अजयकडे आधारकार्ड तसेच मोबाईलही सापडला आहे.

मडगाव - नोकरी शोधण्यासाठी गोव्यात आलेल्या मूळच्या छत्तीसगड राज्यातील एका तरुणाने रेल्वेमध्ये गळफास लावून आत्महत्या केली आहे. अजय प्रदेशराम यादव (25) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी गोव्यातील मडगाव येथील रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर रेल्वे क्रमांक 10103 या गाडीने थांबा घेतला होता. मुंबई - मडगाव या मार्गावर ही रेल्वे धावत असून अजय हा या रेल्वेतून प्रवास करीत होता. मडगाव रेल्वे स्थानकावर गाडी थांबल्यानंतर अन्य प्रवासी उतरल्यानंतर त्याने चादरने गळफास लावून आत्महत्या केली. अनैसर्गिक मृत्यू म्हणून कोकण रेल्वे पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. उपनिरीक्षक तुळशीदास मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहे.

अजयकडे आधारकार्ड तसेच मोबाईलही सापडला आहे. पोलिसांनी मोबाईलच्या मदतीने त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यानंतर अजयचे नातेवाईक गोव्याकडे रवाना झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अजय यादव हा छत्तीसगड राज्यातील बिलासपूर येथील आहे. नोकरी नसल्याने तो कामासाठी छत्तीसगडहून मुंबईला आला होता. तेथून तो रेल्वेमार्गे गोव्यात आला होता असे तपासात आढळून आले आहे. अजयकडे मुंबईच्या एका हॉटेलाचे बील सापडले. या हॉटेलमध्ये त्याने जेवण केले होते. तेथून त्याने गोव्याकडे जाणारी रेल्वे पकडली होती. तसेच त्याच्याकडे रेल्वे प्रवासाचे तिकीट नव्हते असेही तपासात आढळून आले आहे. रेल्वे मास्तरने अजयने आत्महत्या केल्याचे आढळून आल्यानंतर त्यांनी यासंबधी कोकण रेल्वे पोलिसांनी कळवले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह सध्या गोवा वैदयकीय महाविदयालयाच्या शवागरात ठेवला आहे. 

 

टॅग्स :goaगोवाSuicideआत्महत्याDeathमृत्यू