आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवतीला तरुणांनी वाचवले
By पूजा प्रभूगावकर | Updated: March 29, 2024 13:40 IST2024-03-29T13:39:39+5:302024-03-29T13:40:07+5:30
नव्या पाटो पुलावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका युवतीला काही तरुणांनी वाचवले. यामुळे एकच खळबळ उडाली.

आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवतीला तरुणांनी वाचवले
पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: शहरातील नव्या पाटो पुलावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका युवतीला काही तरुणांनी वाचवले. यामुळे एकच खळबळ उडाली.
सदर घटना ही शुक्रवारी सकाळी घडली. नव्या पाटो पुलाच्या रेलिंग जवळ ही युवती उभी होती. उडी मारण्यासाठी ही युवती रेलिंगवर चढली. इतक्या त्या मार्गावरुन जाणाऱ्या वाहन चालकांनी वाहने थांबवली व तिला समजावून खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. परंतु तिने त्यांचे काहीच न ऐकता उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच या तरुणांनी तिचा हात धरुन तिला वर खेचले. त्यामुळे ती बचावली. या युवतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला , हे मात्र समजू शकले नाही.
मात्र या वेळी सदर तरुणी बऱ्याच तणावात असल्याचे दिसून आले.ती चांगल्या तसेच सुशिक्षित कुटुंबातील असल्याचे वाटत होते. दरम्यान या तरुणांनी युवतीला आत्महत्या करण्यापासून रोखत तिचा जीव वाचवला यासाठी त्यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.