इफ्फीस्थळी आंदोलन चुकीचे
By Admin | Updated: November 24, 2015 01:32 IST2015-11-24T01:32:11+5:302015-11-24T01:32:35+5:30
पणजी : भारतीय फिल्म व टेलिव्हिजन संस्थेच्या (एफटीआयआय) विद्यार्थ्यांनी येऊन इफ्फीस्थळी आंदोलन करणे हे चुकीचे

इफ्फीस्थळी आंदोलन चुकीचे
पणजी : भारतीय फिल्म व टेलिव्हिजन संस्थेच्या (एफटीआयआय) विद्यार्थ्यांनी येऊन इफ्फीस्थळी आंदोलन करणे हे चुकीचे आहे, असे मत मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.
इफ्फीस्थळी चित्रपट महोत्सव संचालनालयाकडून छळ होत असून आम्ही नजरकैदेत असल्यासारखेच आहोत, असे या विद्यार्थ्यांनी रविवारी पणजीत पत्रकारांना सांगितले होते.
यासंदर्भात पत्रकारांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, की या विद्यार्थ्यांचा प्रश्न हा गोवा राज्याशी संबंधित नाही. आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांनाच असतो; पण या विद्यार्थ्यांनी इफ्फीस्थळी येऊन निषेधात्मक आंदोलन करणे मी मान्य करत नाही. इफ्फी हा आंतरराष्ट्रीय सोहळा असून अशा सोहळ्याला गालबोट लागल्यास गोव्याची प्रतिमा खराब होईल. गोवा हे पर्यटन राज्य आहे याचा विचार व्हायला हवा.
मुख्यमंत्री म्हणाले, की या विद्यार्थ्यांचा राज्य सरकारशी वाद नाही. त्यांनी योग्य व्यासपीठावर स्वत:चे म्हणणे मांडायला हवे. ते आपल्याला येऊन भेटले असते तर तो विषय वेगळा असता. त्यांनी आपल्याला भेटावेच, आपण त्यांना मदत करीन; पण इफ्फीस्थळी निषेध नोंदविणे योग्य नव्हे. या विद्यार्थ्यांचा इफ्फीस्थळी छळ केला जात आहे, असे मला वाटत नाही.
(खास प्रतिनिधी)