लहान व्यावसायिकांचे कर्ज माफ करा : ‘निशुल्क कर्ज मुक्ति अभियाना’ अंतर्गत पणजी आझाद मैदानावर धरणे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 04:22 PM2024-03-13T16:22:50+5:302024-03-13T16:24:06+5:30

या मागणीसाठी ‘निशुल्क कर्ज मुक्ति अभियाना’ अंतर्गत पणजी आझाद मैदानावर धरणे धरण्यात आली.

Write off the loans of small businessmen: Dharna at Panaji Azad Maidan under 'Free Debt Mukti Abhiyan' | लहान व्यावसायिकांचे कर्ज माफ करा : ‘निशुल्क कर्ज मुक्ति अभियाना’ अंतर्गत पणजी आझाद मैदानावर धरणे

लहान व्यावसायिकांचे कर्ज माफ करा : ‘निशुल्क कर्ज मुक्ति अभियाना’ अंतर्गत पणजी आझाद मैदानावर धरणे

नारायण गावस

पणजी: देशभर भाजप सरकारने मोठ्या उद्योगपतींची कर्ज माफी केली आहे. त्यामुळे आता भाजप सरकारने सर्वसामान्य व्यावसायिकांची कर्जमाफी करावी.  या मागणीसाठी ‘निशुल्क कर्ज मुक्ति अभियाना’ अंतर्गत पणजी आझाद मैदानावर धरणे धरण्यात आले. या अभियानात राज्यभरातील जवळ १ हजार सभासदांची नाेंदणी असून सरकारने सर्वांची कर्ज माफी करावी अशी मागणी करण्यात आली. 

निशुल्क कर्ज मुक्ति अभियानाचे अध्यक्ष संदिप नाईक म्हणाले, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज अनेक लहान व्यावसायिक कर्ज बाजारी पडले आहेत. यात खाण बंदी, कराेना महामारी, नोटांबदी, जीएसटी यामुळे लहान व्यावसाय बंद पडला त्यामुळे लोकांनी जे कर्ज  काढले होते त्याचा व्याज दर वाढला आहे. आता हे सर्वसामान्य लोकांना कर्ज भरता येत नाही. त्यामुळे  सरकारने या गरीब व्यावसायिकांचे कर्ज माफी करावी त्यांना चिंतामुक्त जगायला द्यावे.

नाईक म्हणाले, हे सरकार उद्याेगपतींचे कर्ज माफ करु शकते तर मग सर्वसामान्य लोकांचे कर्ज माफ का करु शकत नाही. भाजपला मते हवी असल्यास त्यांनी  सर्वसामान्य लोकांचा विचार करायला हवा. आज या राजकारण्यांमुळे लाेकांच्या जमिनी गेल्या लहान व्यावसाय  बंद पडले. आता या सर्वसामान्य गरीब लाेकांकडे काहीच नाही. त्यामुळे ही कर्ज माफी करावी असे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत राज्यभरातून आलेले या अभियानाचे काही सदस्य उपस्थित होते.

Web Title: Write off the loans of small businessmen: Dharna at Panaji Azad Maidan under 'Free Debt Mukti Abhiyan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा