कामगारांचा राजधानीत मोर्चा

By Admin | Updated: June 11, 2015 01:12 IST2015-06-11T01:11:37+5:302015-06-11T01:12:06+5:30

पणजी : वेतनवाढीसाठी मागणी करणाऱ्या महापालिकेच्या कामगारांना बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटी कामगारांनी पाठिंबा दिला.

Workers' Frontier Front | कामगारांचा राजधानीत मोर्चा

कामगारांचा राजधानीत मोर्चा

पणजी : वेतनवाढीसाठी मागणी करणाऱ्या महापालिकेच्या कामगारांना बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटी कामगारांनी पाठिंबा दिला. दुपारच्या वेळी मनपा कामगारांकडून काढण्यात आलेल्या मोर्चात बांधकाम विभागाच्या साडेसातशे कामगारांनी सहभाग घेतला. या वेळी साधारण एक हजार कामगारांनी शहरात मोर्चा काढला.
महापालिकेने वेतनवाढ द्यावी म्हणून गेल्या पंधरा दिवसांपासून दुपारच्या वेळेत मनपाचे रोजंदारीवरील साडेतीनशे कामगार निदर्शने करत आहेत. शहरातील कचरा उचलणारे, साफसफाई करणारे तसेच उद्यानाची देखभाल करणारे कामगार आपले सकाळच्या वेळेतील काम पूर्ण करून दुपारी १२.३0 वाजता मनपा इमारतीसमोर एकत्रित येतात. येथे येऊन आपल्या मागण्यांसाठी निदर्शने करतात तसेच इमारतीच्या आसपास असलेल्या सर्व भागात मोर्चा काढून वेतनवाढीबाबतच्या मागण्या पूर्ण कराव्यात म्हणून नारे देतात. शनिवारपर्यंत कामगार अशाप्रकारे निदर्शने करणार. मात्र, मनपाने वेतन वाढीबाबत निर्णय न दिल्यास कामगारांकडून सोमवारपासून कचरा उचलणे बंद करण्यात येईल. बांधकाम खात्याच्या कामगारांनी मनपा कामगारांवर वेतनवाढीबाबत करण्यात येणाऱ्या अन्यायाचा निषेध केला आहे.
सरकारच्या अंतर्गत विविध खात्यात, सरकारी कार्यालयात अधिकाऱ्यांचे गट तयार झाले असून कायद्याप्रमाणे होणे गरजेचे असल्याच्या बाबीही लॉबीमुळे लांबणीवर टाकण्यात येतात किंवा कामगारांत फूट घालून त्यांच्या मागणी धुडकावून लावण्याचा प्रयत्न करण्यात येतो. कामगारांच्या वेतन वाढीचा विषय आला की, सरकारी तिजोरीत निधी नसल्याची कारणे सांगून वेळ मारून नेण्यात येते, असे राणे म्हणाले.
(प्रतिनिधी)

Web Title: Workers' Frontier Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.