शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

म्हापशात रोलर कलंडून महिला ठार, युवक जखमी

By admin | Updated: January 20, 2015 02:15 IST

दहा दुचाकींचा चक्काचूर : चालकाचे प्रसंगावधान

बार्देस : म्हापसा पालिकेकडून बाजारपेठेच्या दिशेने येणाऱ्या रोड रोलरचा ब्रेक निकामी झाल्याने दुचाकीला धडक बसून महिला ठार झाली, तर दुचाकीस्वार युवक जखमी झाला आहे. ललिता संतोष मडगावकर (वय ५०, रा. गवंडाळ, उसकई-बार्देस) असे मृत महिलेचे नाव असून तिचा मुलगा शुभम मडगावकर (वय १९) याच्यावर म्हापसा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बेफाम वेगाने जाणाऱ्या रोलरखाली अनेक दुचाक्या सापडल्या, तसेच दोन दुकानांना रोलने धडक दिली. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखून आरडाओरडा केल्याने अनेकांनी आपापल्या गाड्या बाजूला घेऊन सुरक्षित जागी पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास म्हापसा न्यायालयाकडून पालिकेच्या बाजूने बाजारपेठेच्या दिशेने येणाऱ्या रोड रोलरचे ब्रेक निकामी झाले व रोलरने वेग घेतला. ही बाब चालक बसू यल्लाप्पा खरेनवथ (वय २८, रा. गोकाक-कर्नाटक, सध्या रा. मडगाव) याच्या लक्षात येताच त्याने एका हाताने स्टेअरिंग धरले, तर दुसऱ्या हाताने लोकांना इशारे करून मोठ्याने आरडाओरडा केला. त्या वेळी पादचाऱ्यांनी धूम ठोकली, तर वाहनचालकांनी रस्त्याच्या एका कडेला वाहने उभी केली. मात्र, एका दुचाकीला रोलर आदळल्याने महिला ठार झाली व दुचाकी चालवणारा तिचा मुलगा जखमी झाला. रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुचाकींना चिरडत रोलर पालिकेच्या उतरणीवर असलेल्या मिनेझिस औषधालयाच्या बाजूला मंगेश फोस्टो स्टुडिओजवळ कलंडला. या अपघातात एकूण दहा दुचाकी चिरडल्या गेल्या, तर एका चारचाकीला धक्का लागून नुकसान झाले. काही दुकानदारांचेही नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती म्हापसा शहरासह परिसरात कळताच हजारो लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती मिळताच म्हापसा पोलीस, वाहतूक पोलीस व अग्निशामक दलाने घटनास्थळी येऊन मदतकार्य केले. या वेळी म्हापसा पोलीस स्थानकाचे पोलीस उपअधीक्षक महेश गावकर, निरीक्षक तुषार वेर्णेकर, इतर पोलीस उपस्थित होते. तसेच म्हापसा अग्निशामक दलाचे अधिकारी बॉस्को फेर्राव, जवान हनुमंत हळदणकर, अशोक मिशाळ, विष्णू गावस, नामदेव तारी, नारायण चोडणकर, नरेंद्र शेट्ये, जितेंद्र सिनारी, रामा नाईक, संतोष तानावडी, प्रदीप गावकर यांनी घटनास्थळी जाऊन बचावकार्य केले. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने रोड रोलर काढण्यात आला. या अपघातामुळे सुमारे दीड तास वाहनांची कोंडी झाली होती. (पान २ वर)