शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

फुगे विकता विकता तिने विकले ड्रग्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 10:40 PM

गरीब बिचारी, फुगे विकून आपली उपजिविका चालविते असे कालपरवापर्यंत ज्या महिलेकडून पाहून लोक म्हणत होते ती महिला आज ड्रग्स विकण्याच्या प्रकरणात पणजी पोलिसांच्या कोठडीत आहे. 

पणजी - गरीब बिचारी, फुगे विकून आपली उपजिविका चालविते असे कालपरवापर्यंत ज्या महिलेकडून पाहून लोक म्हणत होते ती महिला आज ड्रग्स विकण्याच्या प्रकरणात पणजी पोलिसांच्या कोठडीत आहे. या महिलेचे नाव ललिता पवार (३०)असे असून कांपाल पणजी येथील बालभवनाच्या विरुद्ध असलेल्या रस्त्याच्या बाजूला फुगे विक्री करताना ती लोकांना दिसत होती. तिच्याबरोबर आणखी काही मंडळीही दिसायची. तिचे ते कुटुंबिय असल्याचे पोलीस सांगतात. फुगे एकाच जागी राहून विकत होते असेही नव्हते. ती शहरात सगळीकडे फिरत होती. परंतु बहुतेक वेळा कांपाल येथे दिसायची. तेथेच ती राहत होती. गुरूवारी ती अशीच फुगे विकण्यासाठी म्हणूनच पणजी बाजाराच्या ठिकाणी गेली होती. तेथील हॉटेल सुशेगादोजवळ ती गि-हायिकाची वाट पाहत उभी होती. परंतु हे गि-हायिक फुग्यांसाठी नव्हते तर गांजासाठी होते हे नंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर उघड झाले. तिच्याकडे ५० हजार रुपये किंमतीचा गांजा सापडल्यामुळे पोलिसांनी तिला अटक केली. ती मूळची पंढरपूर येथील असून  मागील ब-याच काळापासून ती पणजीलाच होती. तिच्या बरोबर तिचे कुटुंबही आहे आणि त्यात पुरूष मंडळीही आहे. त्यातील एकाला असेच एकदा अशाच प्रकारच्या गुन्ह्याच्या प्रकरणात पोलिसांनी अक केली होती. ही महिला फुगे विकत असली तरी काही तरी संशयास्पद व्यवहार करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनीच व्यवस्थीत सापळा रचून तिला रंगेहाथ पकडण्यात यश मिळविले.

टॅग्स :Drugsअमली पदार्थgoaगोवा