ई-मेल हॅक केल्याप्रकरणी महिलेला अटक
By Admin | Updated: June 16, 2015 01:15 IST2015-06-16T01:15:34+5:302015-06-16T01:15:43+5:30
पणजी : वाहतूक अधिकाऱ्याचा अधिकृत ई-मेल हॅक करून त्या मेलद्वारे वाहतूक अधिकाऱ्यांची बदनामी करण्याच्या प्रकरणात एका महिलेला सायबर

ई-मेल हॅक केल्याप्रकरणी महिलेला अटक
पणजी : वाहतूक अधिकाऱ्याचा अधिकृत ई-मेल हॅक करून त्या मेलद्वारे वाहतूक अधिकाऱ्यांची बदनामी करण्याच्या प्रकरणात एका महिलेला सायबर विभागाकडून अटक करण्यात आली. या महिलेचे पती वाहतूक खात्यात कामाला असतात.
उत्तर गोवा साहाय्यक वाहतूक संचालकाच्या अधिकृत ई-मेलने गेले काही दिवस आक्षेपार्ह ई-मेल पाठविले जात होते. हे ई-मेल कार्यालयातील अधिकाऱ्यांनाही पाठविले गेले होते. त्यात वाहतूक खात्यातील सर्व ज्येष्ठ व कनिष्ठ अधिकाऱ्यांना भ्रष्ट ठरवून त्यांच्याविषयी लाखोंचा गैरव्यवहार करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. इतकेच नव्हे, तर त्याहीपुढे जाऊन अश्लील आरोपही करण्यात आले होते.
ज्या साहाय्यक वाहतूक संचालकाचा ई-मेल वापरून हे मेल पाठविण्यात येत होते ते अधिकारी उदय गावस यांच्या नजरेस ही घटना आणून दिल्यानंतर त्यांनी सायबर विभागात जाऊन तक्रार नोंदविली.
तक्रार नोंदविल्यानंतर तपासाची चक्रे फिरू लागली आणि हे ई-मेल कोठून पाठविण्यात आले याचा पर्दाफाशही झाला. एका २६ वर्षीय महिलेला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तिच्या मोबाईलवरून हे ई-मेल गेले असल्याचे स्पष्ट झाले आहे. नंतर तिची जामिनावर सुटका करण्यात आली.
(प्रतिनिधी)