शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक कुटुंबाच्या पाठीशी खंबीर राहणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची साखळी मतदारसंघातील जनतेला ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 13:00 IST

बूथ चलो अभियानास प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : प्रत्येक घरात समृद्धी हा आमचा संकल्प आहे आणि त्यासाठी घरातील प्रत्येकाने आपापल्या परीने कौशल्य विकसित करताना प्रत्येक हाताला काम या माध्यमातून कौशल विकासावर भर देण्याची गरज आहे. माझ्या मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा आहे. परंतु प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

बूथ चलो अभियान अंतर्गत हरवले पंचायत क्षेत्रातील १५ व १६ बूथ क्रमांकावरील कार्यकर्त्यांशी मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिकरीत्या भेटून चर्चा केली. त्यांच्या विविध समस्या, त्यांचे विचार तसेच त्यांच्या मनातील विकासाची संकल्पना जाणून घेतली. यावेळी स्थानिक पदाधिकारी, तसेच सरपंच गौरवी नाईक व मान्यवर उपस्थित होते.

प्रत्येक घरापर्यंत विकास ही भाजपची संकल्पना असून, पायाभूत, मूलभूत विकासाबरोबर मानवी विकासावर सरकारचा भर आहे. मात्र, त्याचबरोबर प्रत्येक हाताला काम द्यायचे असेल तर कौशल्य विकसित होणे काळाची गरज आहे. त्यासाठी स्वयंपूर्ण आत्मनिर्भरतेचा ध्यास घेऊन प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रत्येकाच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी माझे सरकार व वैयक्तिरीत्या माझे सातत्याने प्रयत्न असतील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीदरम्यान दिली.

'भिवपाची गरज ना'

डबल इंजिन सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे 'भिवपाची गरज ना'. कशाचीही कमतरता नाही, मात्र प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी कार्यकर्त्यांना केले.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतBJPभाजपा