आरग, मिरज येथील अनाथ आणि बेघर झालेल्या भावंडासाठी घर बांधून देणार- गोव्याचे सभापती रमेश तवडकर यांची घोषणा
By किशोर कुबल | Updated: February 7, 2024 21:59 IST2024-02-07T21:59:14+5:302024-02-07T21:59:51+5:30
- श्रम धाम योजने अंतर्गत उपक्रम

आरग, मिरज येथील अनाथ आणि बेघर झालेल्या भावंडासाठी घर बांधून देणार- गोव्याचे सभापती रमेश तवडकर यांची घोषणा
गोव्यात काणकोण येथे 'श्रम धाम' उपक्रमाचे ते मार्गदर्शक आहेत. मतदारसंघात गरजू लोकांसाठी २० घरे त्यांनी बांधून दिली आहेत.महाराष्ट्रातील आरग गावात स्थानिक पंचायतीच्या विनंतीवरून त्यांनी घर बांधून देण्याचा निर्णय घेतला आहे.तवडकर म्हणाले की पंचायतीने मला कुटुंबाला मदत करण्याची विनंती केली. विविध सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींकडून त्यांना मदत मिळेल हे मी पाहीन.'
आरग पंचायतीचे सरपंच एस. एस. नाईक यांनी सभापतींना लिहिलेल्या पत्रात पवार कुटुंबातील अल्पवयीन भावंडे आई-वडिलांचे छत्र हरपल्याने अनाथ झाल्याची माहिती तवडकर यांना दिली. सध्या जीर्ण अवस्थेत असलेले त्यांचे घर बांधण्यासाठी त्यांना मदत करण्याची विनंतीही केली. श्रमधाम संकल्पने खाली बांधलेली वीस घरे गेल्या वर्षी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लाभार्थ्यांना सुपूर्द केली होती. गरीब, गरजू कुटुंबांना घरे बांधून घेण्याचे आपले कार्य विस्तारण्याची घोषणाही तवडकर यांनी याआधी केलेली आहे.
केवळ काणकोण मतदारसंघातच नव्हे तर गोव्यात इतरत्रही अशी घरे बांधून दिली आहेत. दक्षिण गोव्यातील साकोर्डा पंचायत क्षेत्रातील धारगे गावात काही दिवसांपुर्वी तृप्ती तुळशीदास गावकर यांचे घर पडले होते. तेव्हापासून गावकर कुटूंबीय बेघर झाले होते. या कुटुंबालाही घर बांधून देण्यात आले.