शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीने पतीची हत्या करुन मृतदेहाचे केले तीन तुकडे, पतीच्या संशयी स्वभावामुळे केलं कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 14:40 IST

 पतीकडून सतत चारित्र्याचा संशय घेण्यात येत असल्यामुळे डूख धरुन असलेल्या पत्नीने आपल्या अन्य तीन साथीदारांच्या सहाय्याने पतीचाच खून करुन नंतर त्याच्या मृतदेहाचे तीन तुकडे करुन विल्हेवाट लावण्याची घटना घडली आहे.

- सुशांत कुंकळयेकर

मडगाव :  पतीकडून सतत चारित्र्याचा संशय घेण्यात येत असल्यामुळे डूख धरुन असलेल्या पत्नीने आपल्या अन्य तीन साथीदारांच्या सहाय्याने पतीचाच खून करुन नंतर त्याच्या मृतदेहाचे तीन तुकडे करुन विल्हेवाट लावण्याची  घटना मडगावपासून 22 कि.मी. अंतरावर असलेल्या कुडचडे गावात घडली. वास्तविक हा खून एक महिन्यापूर्वी झाला होता. संशयित महिलेच्या अन्य एका मैत्रिणीने एका महिन्यानंतर कुडचडेतील आणखी एका महिलेला या खुनाची माहिती दिल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली.

या प्रकरणात कुडचडे पोलिसांनी मयत बसवराज बारीकी (41) याची पत्नी कल्पना हिच्यासह तिचे मित्र सुरेशकुमार, अब्दुल करीम शेख व पंकज पवार या चौघांना अटक केली आहे. तर आणखी एक संशयित आदित्य हा फरार आहे. बुधवारी कुडचडे पोलिसांनी या चारही संशयितांना केपे न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना सात दिवसांच्या पोलीस कोठडीचा रिमांड देण्यात आला.

अंगावर शहारे आणणारी ही घटना 2 एप्रिल रोजी घडली होती. मात्र या खुनाला वाचा तब्बल महिनाभराने म्हणजे 8 मे रोजी फुटली. कल्पना आणि तिच्या साथीदारांनी केलेला हा खून कल्पनाची मैत्रिण सीमरन हिला माहित होता. मागचा महिनाभर या खूनाच्या तणावाखाली दिवस काढल्यावर सीमरनने कुडचडे येथील एक सामाजिक कार्यकत्र्या उषा नाईक हिला या खुनाची माहिती दिली. नाईक हिने कुडचडे पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर 8 मे रोजी रात्री चारही संशयितांना अटक करण्यात आली.

दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिलेल्या माहितीप्रमाणो, मयत बसवराज हा व्यवसायाने टॅक्सी ड्रायव्हर होता. आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने तो उत्तर गोव्यातच कायम रहायचा. त्याच्या अनुपस्थितीत त्याची पत्नी कल्पना हिचे आपल्या अन्य साथीदाराशी अनैतिक संबंध जुळले होते. याच संबंधावरुन पती-पत्नीमध्ये तणावाचे वातावरण होते. 

2 एप्रिल रोजी मयत बसवराज हा कुडचडे येथील आपल्या घरी आला असता, याच अनैतिक संबंधावरुन त्याचा पत्नीशी वाद झाला. यावेळी पत्नीने आपल्या पतीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर आपल्या इतर साथीदारांना घरी बोलावून घेतले. धारदार कोयत्याने मृतदेहाचे तीन तुकडे करुन नंतर एका गाडीतून ते अनमोड घाटावरील जंगलात नेऊन टाकण्यात आले. बुधवारी सकाळी कुडचडे पोलिसांनी अनमोडच्या जंगलात जाऊन विल्हेवाट लावलेल्या मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या खुनात वापरलेला कोयता कुडचडे पोलिसांनी जप्त केला आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखून