प्रादेशिक आराखडा छाननी समिती कुठे?

By Admin | Updated: February 2, 2016 03:23 IST2016-02-02T03:19:35+5:302016-02-02T03:23:20+5:30

पणजी : राज्याच्या प्रादेशिक आराखड्यासाठी आलेल्या हजारो सूचना व आक्षेपांची छाननी करून निर्णय घेण्यासाठी जी समिती स्थापन व्हायला हवी,

Where is the regional plan scrutiny committee? | प्रादेशिक आराखडा छाननी समिती कुठे?

प्रादेशिक आराखडा छाननी समिती कुठे?

पणजी : राज्याच्या प्रादेशिक आराखड्यासाठी आलेल्या हजारो सूचना व आक्षेपांची छाननी करून निर्णय घेण्यासाठी जी समिती स्थापन व्हायला हवी, ती अजूनही सरकार स्थापन करू शकलेले नाही.
प्रादेशिक आराखडा कसा असावा आणि कुठल्या भागात लोकवस्तीचे विभाग नको आहेत, या विषयीच्या सुमारे सहा हजार सूचना मुख्य नगर नियोजकांच्या कार्यालयाकडे आल्या आहेत. या शिवाय पूर्वीच्या साडेतीन हजार सूचना प्रलंबित आहेत. या सर्व सूचनांची तालुकानिहाय वर्गवारी खात्याने केली आहे. पण या सूचनांवर निर्णय घेण्यासाठी तज्ज्ञांची राज्यस्तरीय समिती नेमणे गरजेचे आहे.
आराखड्याचा विषय अत्यंत नाजूक व वादाचा असल्याने सरकार काळजी घेत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
(खास प्रतिनिधी)

Web Title: Where is the regional plan scrutiny committee?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.