तू गेल्यावर या वाटेने, चिमणीदेखील नच फिरके 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 01:38 AM2020-11-30T01:38:57+5:302020-11-30T01:39:01+5:30

पुणे येथे कामानिमित्त गेलो असता, शिवाजीनगर परिसरात एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एक फलक पाहून मन भरून आले.

When you go this way, don't even turn the chimney | तू गेल्यावर या वाटेने, चिमणीदेखील नच फिरके 

तू गेल्यावर या वाटेने, चिमणीदेखील नच फिरके 

googlenewsNext

अजय बुवा

पणजी  : मराठी साहित्य विश्वात ‘आनंदयात्री’ कवी अशी ओळख निर्माण केलेल्या बाळकृष्ण भगवंत बोरकर, अर्थात बा. भ. बोरकर यांचा आज जन्मदिवस. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत आज त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साहित्य सोहळ्यांचे आयोजन होत असेल. कोणे काळी ‘बाकीबाब’ म्हणत गोमंतकीयांनी त्यांना काळजाच्या कप्प्यात आदराचे स्थान दिले होते. परंतु, सरकार दरबारी बाकीबाबांविषयी एवढी उदासीनता का? बाकीबाबांचे जन्मस्थान असलेल्या बोरी गावात आज सरकारने साहित्य उत्सव आयोजित करायला हवा होता. ज्या घरात बाकीबाबांचा जन्म झाला घराकडची भग्नता पाहिल्यानंतर मन विषण्ण होते.

पुणे येथे कामानिमित्त गेलो असता, शिवाजीनगर परिसरात एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एक फलक पाहून मन भरून आले. ‘पद्मश्री बा. भ. बोरकर या घरात राहात होते’ असे तेथे एका परक्या माणसाने अभिमानाने लिहिलेले आहे. बाकीबाबांची एक फार जुनी कविता आहे.
तू गेल्यावर या वाटेने
चिमणीदेखील नच फिरके
कसे अचानक झाले नकळे
अवघे जग परके परके...
प्रागतिक विचार मंच या संस्थेने काही वर्षांपूर्वी त्या घरावर एक फलक लावल्याने ये-जा करणाऱ्या लोकांना कळते की, त्या घरात बाकीबाब जन्माला आले होते. 
काही लोक आपसूकच मग त्या घराकडे पाहून हात जोडतात. परंतु, नतमस्तक झालेल्या लोकांना घर मात्र म्हणत असतं,
मध्यरात्री नभ घुमटाखाली
शांतिशिरी तम चवऱ्या ढाळी
त्यात बहिष्कृत मी 
ज्या काळी एकांती डोळे भरती...
दैवदत्त प्रतिभेचा आनंदानुभव ज्यांनी काव्यरसिकांना भरभरून दिला, त्या बाकीबाबांच्या स्मृतिस्थळासाठी गोव्याचे कला व संस्कृती खाते, पर्यटन खाते यांनी संयुक्तपणे प्रयत्न करणे, हीच आजच्या दिवशी बाकीबाबांना आदरांजली असेल.
 

Web Title: When you go this way, don't even turn the chimney

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.