शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

कर्नाटक कालवा खणत होते तेव्हा भजी भाजत होते ?, कॉंग्रेसचा मुख्यमंत्र्यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 10:27 PM

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बी. एस. येडिययुरप्पा यांना लिहिलेल्या पत्रामुळे म्हादई प्रकरणात गोमंतकीय गंभीर नसल्याचा चुकीचा संदेश गेला आणि त्याचा फायदा कर्नाटकने घेतल्याचे सांगून माजी केंद्रीय मंत्री व कॉंग्रेसचे प्रवक्ते रमाकांत खलप यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

पणजी: मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बी. एस. येडिययुरप्पा यांना लिहिलेल्या पत्रामुळे म्हादई प्रकरणात गोमंतकीय गंभीर नसल्याचा चुकीचा संदेश गेला आणि त्याचा फायदा कर्नाटकने घेतल्याचे सांगून माजी केंद्रीय मंत्री व कॉंग्रेसचे प्रवक्ते रमाकांत खलप यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.म्हादईचे पाणी कणकुंबी येथे कर्नाटक अडवित असताना गोवा सरकार आणि प्रशासकीय अधिकारी भजी भाजण्यात व्यस्त होती का, असा सवाल खलप यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की म्हादई प्रकरणात गोवा सरकारने अत्यंत बेजबाबदारपणे वागले आहे. गोव्यातील जरस्रोतांची अजिबात परवा सरकारला नाही, याची प्रचिती त्यामुळे आली. कणकुंबी येथील १० मीटर खोल कालवा खणला जात असतानाही सरकारकडून दखल घेतली नाही. हा मुद्दा लवादापुढे मांडायला हवा होता.न्यायालयाची स्थगिती असतानाही ही कामे चालविल्यामुळे अवमान याचिका दाखल करायला हवी होती. परंतु तसे काहीही न करता सरकार व प्रशासन स्वस्त राहिले. उलट भाजपचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांना वादग्रस्त पत्र लिहून गोव्याची बाजू आणखी कमकुवत केली, असा आरोप त्यांनी केला. या बेजबाबदारपणामुळे मुख्यमंत्र्यांनी खरे म्हणजे आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा. कॉंग्रेस पक्ष त्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत असल्याचे ते म्हणाले.म्हादई प्रकरणात राजेंद्र केरकर यांच्यासारके म्हादई बचाव समितीचे तज्ज्ञ झटत असताना त्यांच्या प्रयत्नांनाही सरकारने खो घातल्याचे खलप यांनी सांगितले. कॉंग्रेस सरकारची म्हादई मुद्यावरील भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. कॉंग्रेसने यू-टर्न घेतलेले नाही. या प्रकरणात बचाव समितीच्या धोरणाला कॉंग्रेसचा पाठिंबा असल्याचे ते म्हणाले. या मुद्यावर कॉंग्रेसच्या झेंड्याखाली लोकांना एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले. अमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनीही या प्रकरणात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी टीका केली. सरकारचेच आमदार मायकल लोबो आणि प्रमोद सावंत या प्रकरणात वक्तव्ये करून सरकारचेच अपयश समोर आणत असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस