कोव्हिड काळात जाहीर केलेल्या आर्थिक मदतीचे काय झाले? गोवा फॉरवर्डचा प्रश्न
By पूजा प्रभूगावकर | Updated: April 13, 2024 18:21 IST2024-04-13T18:20:53+5:302024-04-13T18:21:06+5:30
सरकारने या संबंधीत श्वेतपत्रिका जारी करुन चित्र स्पष्ट करावे. जर ही आर्थिक मदती दिली असेल तर ती कुणाला व किती जणांना मिळाली ? जर नसेल तर का दिली नाही ? हे सुध्दा सांगावे अशी मागणी त्यांनी केली.

कोव्हिड काळात जाहीर केलेल्या आर्थिक मदतीचे काय झाले? गोवा फॉरवर्डचा प्रश्न
पणजी: कोव्हिड काळात गोवा सरकारने मोटरसायकल पायलट, मजूर व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती.ही मदत दुर्बल घटकांना मिळाली का ? असा सवाल गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी विचारला आहे.
सरकारने या संबंधीत श्वेतपत्रिका जारी करुन चित्र स्पष्ट करावे. जर ही आर्थिक मदती दिली असेल तर ती कुणाला व किती जणांना मिळाली ? जर नसेल तर का दिली नाही ? हे सुध्दा सांगावे अशी मागणी त्यांनी केली.
कामत म्हणाले, कोव्हिड काळात अनेकांच्या व्यवसायावर परिणाम झाला. त्यामुळे सरकारने मोटरसायकल पायलट, मजूर व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आर्थिक मदत जाहीर केली होती. मदत मिळावी म्हणून हजारो लाेकांनी अर्ज केले होते. मात्र त्यापैकी कुणालाही अजून ही मदत मिळाली नाही. ही योजना फक्त लोकांना फसवण्यापुरती हाेती का ? या मदतीसाठी सरकारकडे किती अर्ज आले ? त्यापैकी किती जणांना मदत मिळाली? याची विधानसभा मतदारसंघ निहाय यादी जाहीर करावी अशी मागणी त्यांनी केली.