शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सहल जीवघेणी ठरली, गोव्यातील बार्से येथे एकाचा तळीत बुडून मृत्यू

By सूरज.नाईकपवार | Updated: April 29, 2024 11:11 IST

जवळपास तासभरानंतर मृतदेह शोधून काढण्यात आला. मयत राजेंद्र हा विवाहीत असून, त्याला दोन मुलेही असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मडगाव: सहल जीवावर बेतण्याची दुदैवी घटना काल रविवारी गोव्यातील किर्लादेव बार्से येथे घडली. राजेंद्र शाबा वेळीप असे त्या दुदैवी मयताचे नाव आहे. मित्रांबरोबर सहलीला गेला असता, जेवणापुर्वी भांडी धुण्यासाठी तळीत उतरला असता, तो बुडला. दुपारी तीनच्या दरम्यान ही घटना घडली. नंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला. 

कुंकळ्ळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाचजणांचा एक गट सहलीसाठी बार्शे येथील रानात असलेल्या एका तळीजवळ गेले होते. त्यात राजेंद्रही सहभागी झाला होता. मौजमजा केल्यानंतर जेवण करण्याची वेळ झाल्याने त्यापुर्वी भांडी धुण्यासाठी तो तळीत उतरला असता अचानक बुडला. मदतीसाठी त्यांच्या मित्रांनी एकच आक्रोश केला. स्थानिक लोकही घटनास्थळी धावून आले. गावच्या सरपंचानी नंतर ही माहिती कुंकळ्ळी पोलिस ठाण्याला कळविली. ती मिळताच पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियश यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तेजसकुमार नाईक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. जवळपास तासभरानंतर मृतदेह शोधून काढण्यात आला. मयत राजेंद्र हा विवाहीत असून, त्याला दोन मुलेही असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात मृतदेहावर  आज सोमवारी शवचिकित्सा केल्यानंतर मृतदेह मयताच्या कुटुंबियाच्या ताब्यात देण्यात आला.