शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

आर्श्चयम्... विहीरेच्या पाण्याने घेतला पेट: सुरक्षेसाठी विहीर केली सील

By पंकज शेट्ये | Updated: November 27, 2023 22:02 IST

माटवे-दाबोळी येथील घटनेने खळबळ

वास्को : माटवे - दाबोळी येथील जेक्सन फर्नांडिस यांच्या विहिरीतील पाण्याने पेट घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. जेक्सन यांना विहिरीतील पाण्यातून पेट्रोलसारखा वास आल्याने त्यांनी विहिरीतील पाणी बाहेर काढून आग लावली असता पाण्याने पेट घेतला. या घटनेची माहिती पंच निलम नाईक यांनी प्रशासनाला दिली आहे.

सविस्तर वृत्त असे की, माटवे येथील जेक्सन फर्नांडिस यांच्या घराबाहेर खुप जुनी विहिर आहे. त्या विहिरीचे पाणी पिण्यासाठी आणि इतर कामासाठी वापरले जाते. मात्र, नळ जोडणी आल्यापासून जेक्सन कुटूंब या विहिरीचे पाणी जास्त वापरत नव्हते. दोन दिवसांपासून नळाला कमी पाणी आल्याने कुटूंबीयांनी विहिरीचे पाणी वापरण्यासाठी काढले असता त्यांना पाण्यात पेट्रोलियम पदार्थासारखा वास येऊ लागला. पाण्याची चाचणी करण्यासाठी विहिरीतून पाणी बाहेर काढले असता त्यांना पाण्याचा रंग हलका पिवळा झाल्याचे दिसून आले. त्याबाबत फर्नांडिस कुटुंबीयांनी सोमवारी पंच निलम नाईक यांनी माहिती दिली.

माटवे परिसरातील विहिरीतून पेट्रोलियम पदार्थाचा वास येत असल्याचे कळताच आपण जैवविविधता समितीचे अध्यक्ष रुई आरावजो व इतरांसोबत विहिरीची पाहणी केल्याचे नाईक म्हणाल्या. पाहणीत विहिरीच्या पाण्यातून पेट्रोलसारखा वास आला. ते पेट्रोल, डीझल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पाहणीवेळी विहिरीतील पाणी एका बादलीत बाहेर काढून नंतर त्याला आग लावली असता पाण्याने पेट घेतला. यावेळी परिसरातील अन्य काही विहिरीतूनही असाच वास येत असल्याची माहिती स्थानिकांनी पंच नाईक यांना दिली. माटवे परिसराच्या वरच्या भागातून विविध पेट्रोलियमचा साठा एका व्यवस्थापनाला पाठवण्यासाठी भूमीगत वाहिनी आहे. त्या वाहिनीला गळती लागून तो पदार्थ विहिरीत मिसळला गेला असावा, असा संशय स्थानिकांकडून व्यक्त केला जात आहे. 

प्रशासनाकडून तपासणीया घटनेबाबत उपजिल्हाधिकारी भगवंत करमळी यांनी अग्निशमन दलाच्या जवानांनी विहिरीची पाहणी केल्याचे सांगितले. तसेच विहिरीचे पाणी न वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तलाठ्यांनी विहिरीची पाहणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. तसेच जलस्रोत व गोवा प्रदूषण नियंत्रण महामंडळानेही पाहणी सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना करण्याची सूचना दिल्याचे करमळी यांनी सांगितले.

‘त्या’ घटनेची आठवणकाही वर्षापूर्वी बोगमाळो येथील एका विहिरीतून असाच वास येण्यास सुरवात झाली होती. त्या विहिरीतील पाणी बाहेर काढून आग लावली असता त्यालाही आग लागली होती. त्यानंतर विहिरीतील पाणी बाहेर काढून ती विहिर साफ केली. जेक्सन यांच्या विहिरीतून असाच वास येत असल्याने विहीरीतील पाणी हटवण्यासाठी उपाय योजना करण्यात येणार असल्याचे पंच नाईक यांनी सांगिले.

टॅग्स :goaगोवाfireआग