शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
3
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
4
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
5
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
6
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
7
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
8
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
9
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
10
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
11
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
12
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
13
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
14
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
15
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
16
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
17
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
18
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
19
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
20
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

वजनदार खाती भाजपकडे

By admin | Updated: November 16, 2014 01:30 IST

‘मगो’चे पंख छाटले : सहकार खाते महादेव नाईकांकडे; मिकी, आवेर्तान यांचा शपथविधी

पणजी : मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सर्व मंत्र्यांना शनिवारी सायंकाळी खात्यांचे वाटप केले. भाजपच्या मंत्र्यांना वजनदार खाती देण्यात आली आहेत, तर सरकारमध्ये सहभागी झालेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे मात्र पंख छाटले गेले आहेत. मगोचे अध्यक्ष असलेले मंत्री दीपक ढवळीकर यांना सहकार खाते न देता प्रिंटिंग अ‍ॅण्ड स्टेशनरी हे खाते दिले गेले आहे. सहकार खाते महादेव नाईक यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. शनिवारीच मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या मिकी पाशेको यांनाही महत्त्वाचे खाते दिले गेलेले नाही. ग्रामीण विकास आणि पुरातत्व व पुराभिलेख ही खाती पाशेको यांना मिळाली आहेत. मुख्यमंत्रिपद नाकारले गेल्याने उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा हे नाराज होते. त्यांची नाराजी घालविण्यासाठी त्यांच्याकडे आरोग्य व नगरनियोजन ही अतिरिक्त खाती सोपविण्यात आली आहेत. मगोचे ज्येष्ठ मंत्री सुदिन ढवळीकर यांची पूर्वीचीच खाती कायम ठेवण्यात आली आहेत. दीपक ढवळीकर यांच्याकडील सहकार खाते महादेव नाईक यांना दिल्यानंतर ढवळीकर यांना एखादे महत्त्वाचे खाते दिले जाईल, असे अपेक्षित होते. तथापि, मुख्यमंत्र्यांनी सर्व वजनदार खाती भाजपच्याच मंत्र्यांना दिली आहेत. मुख्यमंत्री पार्सेकर यांनी स्वत:कडे गृह, अर्थ, खाण, पर्सनल, शिक्षण आणि दक्षता ही खाती ठेवली आहेत. पार्सेकर हे मंत्री होते, तेव्हा त्यांच्याकडे आरोग्य व पंचायत ही खाती होती. आरोग्य खाते आता उपमुख्यमंत्री डिसोझा यांना, तर पंचायत खाते दयानंद मांद्रेकर यांना देण्यात आले आहे. कायदा हे अतिरिक्त खातेही डिसोझा यांना दिले गेले आहे. रमेश तवडकर यांना कृषी व पशुसंवर्धन ही अतिरिक्त खाती दिली गेली आहेत. दिलीप परुळेकर यांना पोर्ट्स हे अतिरिक्त खाते दिले गेले आहे. मिलिंद नाईक, एलिना साल्ढाणा, आवेर्तान फुर्तादो यांची पूर्वीचीच खाती कायम ठेवण्यात आली आहेत. पाशेको हे त्यांना दिल्या गेलेल्या खात्यांवर समाधानी राहतात का, हे पाहावे लागेल. यापूर्वी त्यांनी पर्यटन, पशुसंवर्धन, कृषी, बंदर कप्तान अशी अनेक खाती हाताळली होती. त्यापैकी एकही खाते आता त्यांना मिळालेले नाही. मगो पक्षावर नियंत्रण ठेवावे व त्या पक्षाची आणखी वाढ होऊ देऊ नये, या हेतूने पाशेको यांना मंत्रिमंडळात घेतले गेले, हे आता अधिक स्पष्ट झाले आहे. (खास प्रतिनिधी)