शस्त्रे जमा करण्याचे आदेश
By Admin | Updated: January 16, 2015 01:25 IST2015-01-16T01:23:12+5:302015-01-16T01:25:19+5:30
उत्तर गोव्यातील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे बाळगण्यास बंदी लागू केली आहे.

शस्त्रे जमा करण्याचे आदेश
पणजी : उत्तर गोवा जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी पणजीतील विधानसभा पोटनिवडणुकीनिमित्ताने पणजी, आगशी आणि जुने गोवे पोलीस ठाणे क्षेत्रातील शस्त्र परवानाधारकांना शस्त्रे संबंधित पोलीस ठाण्यात जमा करण्याचा आदेश दिला आहे. त्याचप्रमाणे पोटनिवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत म्हणजे १८ फेब्रुवारी २०१५ पर्यंत उत्तर गोव्यातील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे बाळगण्यास बंदी लागू केली आहे.
ही बंदी बँक, सार्वजनिक सेवक, सुरक्षा अधिकारी, राष्ट्रीय रायफल संघटनेचे सदस्य आणि कित्येक वर्षांच्या रीतिरिवाजाप्रमाणे शस्त्रे प्रदर्शित करण्याची परवानगी असलेल्या समाजातील सदस्यांना लागू नाही; परंतु त्यांनी हिंसा व कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात बाधा आणू नये, असे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी शस्त्रे जमा करण्यास सूट दिलेल्यांना ही बंदी लागू नाही.
(प्रतिनिधी)