संस्कृत अभ्यासक्रमाला पूर्णवेळ शिक्षकांची नियुक्ती करू: मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2025 12:08 IST2025-01-29T12:08:14+5:302025-01-29T12:08:49+5:30

आंतरराष्ट्रीय संस्कृत लघु-चित्रपट महोत्सवाचा समारोप

we will appoint full time teachers for sanskrit curriculum said cm pramod sawant | संस्कृत अभ्यासक्रमाला पूर्णवेळ शिक्षकांची नियुक्ती करू: मुख्यमंत्री

संस्कृत अभ्यासक्रमाला पूर्णवेळ शिक्षकांची नियुक्ती करू: मुख्यमंत्री

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्य सरकार संस्कृत शिक्षणासाठी तसेच या प्राचीन भाषेचा वापर करण्याच्या सर्व प्रयत्नांना पाठिंबा देण्याच्या वचनबद्धतेवर ठाम आहे. संस्कृत अभ्यासक्रमांना बळकटी आणण्याच्या दृष्टीने सरकार पूर्णवेळ शिक्षकांची नियुक्ती करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

सहावा आंतरराष्ट्रीय संस्कृत लघु चलचित्रोत्सव राज्य सरकारच्या माहिती आणी प्रसिद्धी विभाग तसेच संस्कृत भारती यांच्या संयुक्त विद्यमाने मनोरंजन संस्थेमध्ये आयोजित केला होता. महोत्सवाच्या समारोप सत्रात मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

काश्मीर येथे वास्तव्य असलेले अभिनेता युवराज कुमार, अभिनेता प्रा. चन्नबसवस्वामी, गोविंद गंधे, संस्कृतभारतीचे प्रचारप्रमुख डॉ. सचिन कठाळे, अखिल भारतीय श्लोकपठण -केंद्र प्रमुख चिन्मय आमशेकर, कोंकण प्रांताध्यक्षा डॉ. कल्पना आठल्ये, गोवा विभाग अध्यक्ष आनंद देसाई, गोवा विभाग मंत्री आत्माराम उमर्ये आदी मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कारापेक्षा चित्रपटाची प्रेक्षक संख्या महत्त्वाची : आदित्य जांभळे

गोव्याचे सुपुत्र व 'आर्टिकल ३७०' चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य जांभळे हे चित्रपटांचे परीक्षक म्हणून लाभले. मला संस्कृत येत नाही, परंतु पुढच्या वेळी नक्कीच संस्कृतमधून मी भाषण करेन. चित्रपटाला पुरस्कार मिळाला की नाही हे महत्त्वाचे नसून तुमचा चित्रपट किती लोक बघतात हे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.

आंतरराष्ट्रीय संस्कृत लघु - चित्रपट :

प्रथम : रहोम्डग, चेन्नई
द्वितीय : अन्वेषणम, नवी-दिल्ली
तृतीय : अन्धकार, कोची

गोवा राज्यस्तरीय संस्कृत लघु-चित्रपट स्पर्धेचा निकाल :

प्रथम : परोपकारार्थमिदं शरीरम् - श्री श्रद्धानंद विद्यालय, पैंगीण
द्वितीय : समयप्रबन्धनम् - डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, अस्नोडा
तृतीयः निर्वापणम् - भाटकर मॉडेल विद्यालय,
मडगाव

संस्कृत रील्स्

प्रथम : यत्र नार्यः न पूज्यन्ते, तत्र ऐश्वर्या अतुल शिंदे, पुणे
द्वितीय : स्वर्गस्य भाषा संस्कृतम् - चेतन गोयल, इंदूर
तृतीय : यशोयुतां वन्दे - पूर्वा चुनेकर, रत्नागिरी
 

Web Title: we will appoint full time teachers for sanskrit curriculum said cm pramod sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.