शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Goa Election 2022 : उत्पल पर्रिकरांविषयी आम्हाला चिंता, भाजप त्यांना योग्य स्थान देईल : देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 08:25 IST

मनोहर पर्रिकर हे आमचे फार मोठे नेते आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी कायम आदर राखला जाईल, फडणवीस यांचं वक्तव्य.

पणजी : उत्पल पर्रिकर यांच्याविषयी आम्हाला चिंता आहे. मी गेले महिनाभर उत्पलच्या संपर्कात आहे. आम्ही अजून त्याच्याशी चर्चा करू, असे भाजपचे नेते व गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. फडणवीस यांनी काल लोकमतच्या पणजी कार्यालयाला भेट दिली. राज्याचे राजकारण, भाजपचे तिकीट वाटप व अन्य अनेक विषयांवर फडणवीस यांनी मनसोक्त संवाद साधला. 

उत्पलविषयी विचारताच फडणवीस म्हणाले, की स्व. पर्रिकर यांचे कुटुंब हे शेवटी आमचे आहे. आम्हाला उत्पलविषयी चिंता असल्याने त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत आम्ही विचार केला आहे. उत्पल यांना सध्या अशा माणसांनी घेरलंय ज्या माणसांना त्यांच्या राजकीय भवितव्याची पर्वा नाही, त्या माणसांना त्यांचा स्वत:चा स्वार्थ साधायचा आहे. उत्पल यांना भाजप योग्य ते स्थान देईल, त्यांना उज्ज्वल भवितव्य असेल. उत्पलनादेखील भविष्यात संधी दिली जाईल. मी अजूनही बोलेन त्यांच्याशी, असे फडणवीस म्हणाले.‘मनोहर पर्रिकर हे आमचे फार मोठे नेते आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी कायम आदर राखला जाईल. उत्पल यांनी पक्षाचे काम करावे, असे फडणवीस म्हणाले.

उत्पल यांच्याभोवती वावरणारे कार्यकर्ते त्यांना चुकीचा सल्ला देत आहेत. त्यांच्या राजकीय भवितव्याशी ते खेळत आहेत. त्यांच्या भवितव्याशी त्यांना काही देणे घेणे नाही, असा दावाही फडणवीस यांनी केला.

एखादाच आमदार गळेल  विद्यमान आमदारांपैकी जवळजवळ सर्वांनाच तिकिटे मिळतील. एखादाच गळेल. एखाद-दुसऱ्याला मिळणार नाही एवढेच पण भाजप स्वबळावर गोव्यात सरकार स्थापन करू शकेल असे मी पूर्ण विश्वासाने सांगतो, असे फडणवीस यांनी नमूद केले. भाजपचे केडर काही ठिकाणी दुखावलेले असले तरी, सर्वजण पक्षासोबत आहेत. बंडखोरीची मोठी समस्या आता नाही. फक्त एक-दोन मतदारसंघांपुरतीच ती आहे, असे फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाManohar Parrikarमनोहर पर्रीकर