वास्कोत संशयित युवक एटीएसच्या जाळ्यात
By Admin | Updated: February 3, 2016 02:48 IST2016-02-03T02:48:56+5:302016-02-03T02:48:56+5:30
वास्को : दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी रात्री येथील रेल्वे स्थानकावर संशयास्पदरीत्या फिरताना एका युवकाला

वास्कोत संशयित युवक एटीएसच्या जाळ्यात
वास्को : दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी रात्री येथील रेल्वे स्थानकावर संशयास्पदरीत्या फिरताना एका युवकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडील लॅपटॉप, सीडी, मोबाईल, पासपोर्ट जप्त केला. ही कारवाई एटीएसने रेल्वे पोलिसांसह केली. संशयिताचे नाव समीर सारदाना आहे.
हा युवक तीन-चार दिवसांपासून वास्को रेल्वे स्थानकावर फिरत होता. रेल्वे पोलिसांनी सोमवारी रात्री त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे वास्को ते कुळेपर्यंतची तिकिटे सापडली आहेत. तसेच त्याच्याकडे पाच पासपोर्ट सापडले.
एटीएसच्या अधीक्षक प्रियंका कश्यप, निरीक्षक नीलेश राणे, उपनिरीक्षक राया नाईक यांनी संशयिताची वास्को स्थानकात दिवसभर चौकशी केली. (वार्ताहर)