लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: दक्षिण गोवा लोकसभा खासदार कॅप्टन विरियातो फर्नाडिस यांना भारतीय निवडणूक आयोगाने कायम ठेवण्यासाठी ओळख सिद्ध करण्याकरिता नोटीस बजावली आहे.
मतदारयादीत नाव चक्क खासदारालाच बजावण्यात आलेल्या या नोटिशीवरून खळबळ उडाली आहे. विरियातो यांनी सोशल मीडियावर स्वतःच या नोटिसीबद्दल माहिती दिली. लोकप्रतिनिधी असलेल्या खुद्द खासदारालाच ओळख सिद्ध करण्यास सांगितल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मतदार याद्यांचे विशेष सघन पुनरिक्षणाचे काम सध्या सुरू आहे. याअंतर्गत विरियातो यांना भारतीय निवडणूक आयोगाकडून एक नोटीस मिळाली. यामध्ये मतदार यादीत त्यांचे नाव कायम ठेवण्यासाठी त्यांची ओळख सिद्ध करण्यास सांगितले आहे.
विरियातो हे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर लढून खासदारही बनले. लढण्यापूर्वीच व्यापक पडताळणी करण्यात आली होती. तरीदेखील आता त्यांना नोटीस आलेली आहे. माजी नौदल अधिकारी असलेले कॅप्टन विरियातो म्हणाले की, 'मी १९८९ पासून एक समर्पित मतदार आहे व नौदलातील २६ वर्षाच्या नसेवेदरम्यान विविध पोस्टिंगवरून अनेकदा गोव्यात येऊन लोकसभा, विधानसभा, ग्रामपंचायत किंवा जिल्हा न पंचायत निवडणुकांसाठी मी मतदान केलेले आहे.'
'... म्हणून अर्ज 'न जुळलेला' या श्रेणीत'
या प्रकरणी मुरगाव संयुक्त मामलेदार म्हणाले की, दाबोळी मतदारसंघात विशेष सघन पुनरिक्षण प्रक्रियेदरम्यान भाग क्र. १९ मधील बीएलओने खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांचा मतदार गणना अर्ज स्वीकारला होता. मात्र या अर्जामध्ये मागील एसआयआर संदर्भातील आवश्यक तपशील, विधानसभा मतदारसंघ क्रमांक, भाग क्रमांक तसेच मतदारयादीतील अनुक्रमांक भरलेले नसल्याचे आढळून आले. माहितीमध्ये त्रुटी असल्यामुळे हा अर्ज विद्यमान मतदारयादीतील नोंदींशी आपोआप जोडला जाऊ शकला नाही. परिणामी संगणकीय प्रणालीत तो 'न जुळलेला' या श्रेणीत वर्गीकृत करण्यात आला. चौकशी सुरू असून तपासणीनंतर निर्णय घेणार.
Web Summary : MP Captain Viriato Fernandes received notice from the Election Commission to verify his identity for voter list retention. His application lacked key details, causing it to be flagged. Officials are investigating.
Web Summary : सांसद कैप्टन विरियातो फर्नांडीस को मतदाता सूची में नाम रखने के लिए पहचान सत्यापित करने का चुनाव आयोग का नोटिस मिला। आवेदन में महत्वपूर्ण विवरणों की कमी के कारण इसे चिह्नित किया गया। अधिकारी जांच कर रहे हैं।