warehouse head suspended in sanjivani sugar factory | संजीवनी साखर कारखान्यातील गोदाम प्रमुख निलंबित
संजीवनी साखर कारखान्यातील गोदाम प्रमुख निलंबित

मडगाव: संजीवनी साखर कारखान्यात गेल्या वर्षीची साखर विक्री करताना एक कोटीपेक्षा अधिक रुपये कमिशन लाटल्याचे संभाषण असलेला एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कामगारांनी गुरुवारी कारखान्याचे गेट अडवून धरली. सध्या या प्रकरणात कारखान्याचा गोदाम प्रमुख आणि केमिस्ट नवीनकुमार वर्मा याला निलंबित करण्यात आले आहे.


संजीवनी हा गोव्यातील एकमेव साखर कारखाना असून सध्या तो आर्थिक संकटात आहे. या आर्थिक संकटातून त्याला बाहेर काढण्यासाठी सरकारकडे मदत मागण्यात आली आहे. या आर्थिक डबघाईमुळे ऊस उत्पादकांचे पैसेही अडून राहिले आहेत आणि कामगारांनाही वेळेवर पगार मिळत नाही. या पाश्र्र्वभूमीवर हा नवीन घोटाळा उघडकीस आल्यामुळे कामगारांमध्येही संतापाचे वातावरण पसरले आहे.


कारखान्याचे  प्रशासक दामोदर मोरजकर यांनी या वृत्ताला दुजोरा देताना, वृत्तपत्रवर आलेली बातमी आणि व्हायरल झालेला व्हिडिओ हे लक्षात घेऊन ही निलंबनाची कारवाई केली आहे. या प्रकरणात सखोल चौकशी केली जाईल असे त्यांनी सांगितले.


गेल्या वर्षीची साखर उचलण्यासाठी यावर्षी गोदामातील अधिका:याने कंत्रटदाराशी हातमिळवणी करुन कमी दरात साखर विकली त्यामुळे कंत्रटदाराला सुमारे तीन कोटी रुपयांचा लाभ झाला. त्यातील एक कोटी रुपये कमिशन म्हणून संजीवनीच्या अधिका:यांना देण्यात आले. अशा प्रकारचे संभाषण व्हायरल झाल्यामुळे गुरुवारी कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला. या प्रकरणात गुंतलेल्या अधिका:यांना त्वरित निलंबित करा अन्यथा आम्ही काम करणार नाही असा इशारा कामगारांनी दिल्यानंतर मोरजकर यांनी निलंबनाचा आदेश काढण्याच्या सुचना दिल्या.


संजीवनीचे कामगार नेते राजेश गावकर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 250 कामगारांनी गेट अडविले. एकाबाजूने कारखाना नुकसानीत जात असल्याचा दावा करुन कामगारांचा पगार अडवून ठेवला जातो आणि दुसऱ्याबाजूने कारखान्याचे अधिकारी मात्र अशातरेने कमिशन खावून सहीसलामत सुटतात असा आरोप यावेळी कामगारांनी केला. अशा अधिकऱ्यांवर जोर्पयत कारवाई होत नाही तोर्पयत आम्ही हा कारखान चालू करायला देणार नाही असा हेका कामगारांनी लावला.


कामगारांच्या दाव्याप्रमाणो, हुबळीच्या एका कंत्रटदाराकडून ही लाच घेतली गेली यात तीन अधिकाऱ्यांचा हात असून त्यात एका महिला अधिका:याचाही समावेश असल्याचा आरोप कारखान्याच्या कामगार संघटनेचे सचिव राजेश गावकर यांनी केला.
 


Web Title: warehouse head suspended in sanjivani sugar factory
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.