शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

डब्ल्यु हॉटेलच्या १५ कुटिरांचे परवाने रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 10:14 PM

डब्ल्यु हॉेलची वागातोर येथील १५  कुटीरांचा परवाना गोवा किनारा नियमन (सीझेडएमए) विभागाकडून मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे ही कुटिरे पाडावी लागणार आहेत. खंडपीठाने याचिका निकालात काढली.  ​​​​​​​

पणजी - डब्ल्यु हॉेलची वागातोर येथील १५  कुटीरांचा परवाना गोवा किनारा नियमन (सीझेडएमए) विभागाकडून मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे ही कुटिरे पाडावी लागणार आहेत. खंडपीठाने याचिका निकालात काढली. डब्ल्यु हॉटेल्सने १६ कुटीरे उभारण्यासाठी सीझेडएमएकडे परवानगी मागितली होती. परंतु ती नाकारण्यात आली होती. नंतर त्याच कुटिरांसाठी कृष्णा देसाई नामक व्यावसायिकाने परवानगी मागितली. त्यांना परवानगी देण्यातही आली. त्यामुळे गोवा फाउंडेशनतर्फे न्यायालयात सीझेडएमएच्या परवान्याला आव्हान दिले होते. ही बांधकामे बांधकाम प्रतिबंध विभागात येत असल्यामुळे ती बेकायदेशीर ठरत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. तसेच कृष्णा देसाई व डब्ल्यु हॉटेलमध्ये झालेला करारही याचिकादाराने खंडपीठाच्या नजरेस आणून दिला. त्यात या कुटिरांद्वारे मिळणाºया उत्पन्नाची वाटणीचा उल्लेख होता. जी परवानगी नाकारण्यात आली होती ती मागिल दारातून देण्यात आल्याचेही याचिकादारातर्फे युक्तिवाद करताना अ‍ॅड नॉर्मा आल्वारीस यांनी न्यायालयाच्या नजरेस आणून दिले होते. हे प्रकरण पुन्हा सीझेडएमएकडे सोपविण्यात आले होते. सीझेडएमएकडून १५ कुटिरांची परवानगी मागे घेण्यात आल्याची माहिती खंडपीठात बुधवारी देण्यात आली. त्यामुळे बांधण्यात आलेली कुटीरे हॉटेलला पाडावी लागणार आहेत. ही याचिका निकालात काढण्यात आली.

टॅग्स :Courtन्यायालयgoaगोवा