आज मतदान
By Admin | Updated: March 18, 2015 01:05 IST2015-03-18T00:59:21+5:302015-03-18T01:05:27+5:30
पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी राज्यात बुधवारी मतदान होत असून १२0९ मतदान केंद्रांवर ७ लाख ८0 हजार ५१७

आज मतदान
पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी राज्यात बुधवारी मतदान होत असून १२0९ मतदान केंद्रांवर ७ लाख ८0 हजार ५१७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. भाजप उत्तरेत २३ आणि दक्षिणेत ११ मिळून एकूण ३४ जागांवर, मगो उत्तरेत २ आणि दक्षिणेत ७ मिळून ९ जागांवर, तर दोन्ही जिल्ह्यांमध्ये १४९ अपक्ष मिळून एकूण १९२ उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांमध्ये सीलबंद होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने ८ मतदान केंद्रे संवेदनशील जाहीर केलेली आहेत. मतमोजणी शुक्रवारी २0 रोजी
होणार आहे.
मंगळवारी सायंकाळीच मतपेट्या आणि अन्य निवडणूक साहित्य घेऊन अधिकारी मतदान केंद्रांवर दाखल झाले. पालिका क्षेत्र वगळता इतरत्र ही निवडणूक होत आहे. महिला मतदारांची संख्या जास्त असून ३ लाख ९४ हजार २00 महिला, तर ३ लाख ८६ हजार ३१७ पुरुष मतदानाचा हक्क बजावतील. सकाळी ८ ते सायंकाळी ५ ही मतदानाची वेळ असून ५ वाजता रांगेत असलेल्यांनाच मतदान करता येईल. मतपत्रिकांद्वारे मतदान घेतले जाईल. सायंकाळी ५ नंतर येणाऱ्यांना मतदान करू दिले जाणार नाही. (प्रतिनिधी)