शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएमवर नको बॅलेट पेपरवर मतदान घ्या, विरोधकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 16:27 IST

यावेळी कॉँग्रेसचे नेते एल्विस गाेमस्, समाजिक कार्यकर्त्या ॲड. प्रतिमा कुतिन्हो, रामा काणकाेणकर, शंकर पोळजी व इतर सदस्य उपस्थित होते.

पणजी:  ईव्हीएम मशिनने मतदान हे संविधानाच्या विरोधात आहे. आम्हाला ईव्हीएमवर मतदान करायचे नसून पूर्वी सारखे बॅलेट पेपरवर मतदार करायचे आहे, अशी मागणी गोवन्स अगेन्स इव्हीएम बॅनरखाली पणजीतील आझाद मैदानावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विविध समाजिक कार्यकर्त्यांनी केली. तसेच २ फेब्रुवारी  राेजी म्हापसा आणि मडगाव येथे आयाेजित केलेल्या ईव्हीएम विरोधी जनजागृती मोहिमेत सहभागी हाेण्याचे आवाहनही जनतेला केले. यावेळी कॉँग्रेसचे नेते एल्विस गाेमस्, समाजिक कार्यकर्त्या ॲड. प्रतिमा कुतिन्हो, रामा काणकाेणकर, शंकर पोळजी व इतर सदस्य उपस्थित होते.

कॉँग्रेसचे नेते एल्विस गोमस् म्हणाले गेली अनेक वर्षे भाजपकडून ईव्हीएमद्वारे मतदान करुन फसवणूक केली जात आहे. देशभर विरोधकांचा ईव्हीएमला विरोध आहे. तरीही ईव्हीएमद्वारे मतदान केले जात आहे. बॅलेट पेपरवर मतदान करणे हा कायद्याने अधिकार आहे. पूर्वी पासून लोक बॅलेटवर मतदान करत आलो आहोत. ईव्हीएम मशिनमध्ये माेठ्या प्रमाणात घोळ केला जात आहे. तो कशा प्रकारे केला जाताे व फसवणूक कशी केली जाते  हे जनतेला आम्ही २ राेजी आयोजित केलेल्या जनजागृती माहिमेत दाखविणार आहेत.

ईव्हीएम हे एक मशिन आहे आणि ते माणसाने तयार केले आहे. त्यामुळे ते कशा प्रकारे बदल घडवून आणू शकते. भाजपला जनतेवर विश्वास नसून ईव्हीएमवर जास्त आहे. म्हणून येत्या निवडणूकीत ते निवडून येण्याचा घोषणा करत आहेत. पण आमचा ईव्हीएमला पूर्ण विराेध असून  निवडणूक आयाेगाने येणारी निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावे, असे प्रतिमा कुतिन्हाे यांनी सांगितले.

टॅग्स :EVM Machineएव्हीएम मशीनcongressकाँग्रेसElectionनिवडणूक