दुपारच्या झोपेसाठी देण्यात येईल अनिवार्य ब्रेक! बरोबर वाचल; 'या' राज्यात देण्यात आलं अनोखे निवडणूक आश्वासन

By श्रीकृष्ण अंकुश | Published: December 2, 2020 12:56 PM2020-12-02T12:56:09+5:302020-12-02T13:04:51+5:30

विजय सरदेसाई यांचे म्हणणे आहे, की शास्त्रीय दृष्ट्याही हे तथ्य सिद्ध झाले आहे, की दुपारची झोप अथवा थोडी विश्रांती घेणाऱ्या लोकांची स्मरणशक्ती अत्यंत चांगली राहते. यामुळे, नोकरी करणारे लोकही चांगल्या प्रकारे काम करू शकतात.

vote for goa forward party and get compulsory siesta hour sussegad sleeping says Vijai sardesai | दुपारच्या झोपेसाठी देण्यात येईल अनिवार्य ब्रेक! बरोबर वाचल; 'या' राज्यात देण्यात आलं अनोखे निवडणूक आश्वासन

दुपारच्या झोपेसाठी देण्यात येईल अनिवार्य ब्रेक! बरोबर वाचल; 'या' राज्यात देण्यात आलं अनोखे निवडणूक आश्वासन

Next
ठळक मुद्देविजय सरदेसाई यांनी म्हटले आहे, की दुपारची झोप अथवा थोडी विश्रांती घेणाऱ्या लोकांची स्मरणशक्ती अत्यंत चांगली राहते. नोकरी करणारे लोकही चांगल्या प्रकारे काम करू शकतात.राज्यात मोठ्या बदलांसाठी सुसेगाडचे संरक्षण करण्याची आवश्यकता - सरदेसाई

पणजी - गोव्यात 2022मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. यासाठी पुढील वर्षीच येथे निवडणूक प्रचाराला सुरुवात होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, यापूर्वीच राजकीय पक्षांनी निवडणूक आश्वासने द्यायला सुरुवात केली आहे. यात गोवा फॉरवर्ड पार्टीने एक वेगळ्याच प्रकारचे निवडणूक आश्वासन दिले आहे.

गोवा विधानसभा निवडणूक 2022साठीचे पहिले निवडणूक आश्वासन समोर आले आहे. इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांनी घोषणा केली, की येणाऱ्या निवडणुकीत आपण मुख्यमंत्री झालो, तर दुपारी झोपण्यासाठी 2 ते 4 वाजेदरम्यान अनिवार्य आरामाच्या तासांची व्यवस्था करू.

सुसेगाड -
गोव्याच्या ओळखीसाठी विजय सरदेसाई यांचा पक्ष गोवा फॉरवर्ड पार्टी अत्यंत आक्रमक राहिला आहे. विजय सरदेसाई यांचे म्हणणे आहे, की 'सुसेगाड'चे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे. पोर्तुगीज शब्द सोसेगैडोपासून सुसेगाड शब्द आला आहे. याचा अर्थ 'शांती' आसा होतो. तसेच, दुपारची झोप सुसेगाडचा एक महत्वाचा भागच आहे. 

विजय सरदेसाई यांचे म्हणणे आहे, की शास्त्रीय दृष्ट्याही हे तथ्य सिद्ध झाले आहे, की दुपारची झोप अथवा थोडी विश्रांती घेणाऱ्या लोकांची स्मरणशक्ती अत्यंत चांगली राहते. यामुळे, नोकरी करणारे लोकही चांगल्या प्रकारे काम करू शकतात. याशिवाय यामुळे अलर्ट राहण्यासाठीही मदत मिळते. एवढेच नाही, तर माणसाचा मूडही चांगला राहतो.

गोव्याची संस्कृती -
अनेकदा असेही दिसते, की दुपारी झोपण्याच्या सवईकडे लोक आळस म्हणूनही पाहतात. मात्र, हे विजय सरदेसाई यांना मान्य नाही. सरदेसाई यांचे म्हणणे आहे, की ही गोव्याची संस्कृती आहे. सर्वांनी याचा सन्मान करायला हवा. तसेच राज्यात मोठ्या बदलांसाठी सुसेगाडचे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे.
 

Web Title: vote for goa forward party and get compulsory siesta hour sussegad sleeping says Vijai sardesai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.