Vivek Agnihotri Kashmir Files : “काश्मीर फाईल्स प्रपोगंडावर आधारित चित्रपट,” फिल्म फेस्टिव्हल ज्युरी मंडळाची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 11:12 PM2022-11-28T23:12:31+5:302022-11-28T23:15:24+5:30

चित्रपट दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांचा चित्रपट 'काश्मीर फाईल्स'वर गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ज्युरींच्या प्रमुखांनी टीका केली.

Vivek Agnihotri Kashmir Files Propaganda Film Jury Criticism iffi jury commented | Vivek Agnihotri Kashmir Files : “काश्मीर फाईल्स प्रपोगंडावर आधारित चित्रपट,” फिल्म फेस्टिव्हल ज्युरी मंडळाची टीका

Vivek Agnihotri Kashmir Files : “काश्मीर फाईल्स प्रपोगंडावर आधारित चित्रपट,” फिल्म फेस्टिव्हल ज्युरी मंडळाची टीका

Next

चित्रपट दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांचा चित्रपट 'काश्मीर फाईल्स'वर गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ज्युरींच्या प्रमुखांनी टीका केली. यावेळी त्यांनी ही “प्रपोगंडा फिल्म” असल्याचं त्यांनी म्हटलं. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी मुख्य भूमिकेत आहेत. देशात अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्तही करण्यात आला होता.

इस्रायली फिल्ममेकर नादव लापिड यांनी विवेक अग्नीहोत्रींच्या द काश्मीर फाईल्स या चित्रपटावर टीका केली आहे. या चित्रपटावर बोलताना त्यांनी हा चित्रपट प्रपोगंडा फिल्म असल्याचं म्हटलं. “आम्ही सर्व १५ वा चित्रपट ज काश्मीर फाईल्स पाहून शॉक्ड होतो. सरकारद्वारे आयोजित करण्यात आलेल्या या फेस्टिव्हलमध्ये द काश्मीर फाईल्स… आम्हाला हा चित्रपट एक प्रपोगंडा फिल्म वाटली. अशा प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवाच्या कलात्मक स्पर्धात्मक विभागासाठी हा चित्रपट निश्चितच पात्र नाही,” असं नादव यांनी म्हटलं.

या कार्यक्रमात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक दिग्गज कलावंतही उपस्थित होते. काश्मीरी पंडितांवर आधारित असलेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. अनेक राज्यांनी हा चित्रपट करमुक्तही केला होता.

Web Title: Vivek Agnihotri Kashmir Files Propaganda Film Jury Criticism iffi jury commented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.