राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मूर्मू यांची जुने गोवें बासिलिका चर्चला भेट
By किशोर कुबल | Updated: August 24, 2023 14:26 IST2023-08-24T14:25:51+5:302023-08-24T14:26:09+5:30
गोवा भेटीवर आलेल्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मूर्मू यांनी आज सकाळी जुने गोवें येथील जगप्रसिध्द बासिलिका ॲाफ बॉ जिझस चर्चला भेट दिली.

राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मूर्मू यांची जुने गोवें बासिलिका चर्चला भेट
पणजी : गोवा भेटीवर आलेल्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मूर्मू यांनी आज सकाळी जुने गोवें येथील जगप्रसिध्द बासिलिका ॲाफ बॉ जिझस चर्चला भेट दिली.
या प्रसंगी त्यांच्या समवेत राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सार्वजनिक बांधकाममंत्री निलेश काब्राल व स्थानिक आमदार राजेश फळदेसाई उपस्थित होते.
महामहीम राष्ट्रपती गेले तीन दिवस गोवा दौऱ्यावर आहेत. मंगळवारी राजभवनवर त्यांचे राज्य सरकारतर्फे नागरी स्वागत करण्यात आले. त्यानंतर बुधवारी त्यांनी गोवा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात संबोधले व दुपारी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आमदारांना संबोधले.
आज दुपारी त्या दिल्लीला परततील.