शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

लंकेच्या संरक्षण सचिवाची गोवा शिपयार्डला भेट, अद्ययावत गस्ती नौकेच्या बांधकामाची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 20:44 IST

वास्को येथील गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये श्रीलंकेसाठी अद्ययावत गस्ती नौकेचे बांधकाम चालले असून, गुरुवारी लंकेचे संरक्षण सचिव कपिला वैद्यरत्ने यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने येथे भेट देऊन कामाची पाहणी केली.

पणजी : वास्को येथील गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये श्रीलंकेसाठी अद्ययावत गस्ती नौकेचे बांधकाम चालले असून, गुरुवारी लंकेचे संरक्षण सचिव कपिला वैद्यरत्ने यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने येथे भेट देऊन कामाची पाहणी केली. श्रीलंका लष्कराचे कमांडर, नौदल महासंचालक, तटरक्षक महासंचालक तसेच अन्य वरिष्ठ अधिका-यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. गोवा शिपयार्डचे चेअरमन रिअर अ‍ॅडमिरल शेखर मित्तल यांच्याशी या शिष्टमंडळाने चर्चा करून बांधकामाची माहिती घेतली.लंकेसाठी गोवा शिपयार्डमध्ये बांधली जाणारी ही दुसरी मोठी गस्तीनौका आहे. पहिली गस्तीनौका निर्धारित मुदतीआधीच बांधकाम पूर्ण करून लंकेकडे सुपूर्द करण्यात आली होती. त्यानंतर २ आॅगस्ट २0१७ रोजी लंकेच्या राष्ट्राध्यक्षांनी या नौकेचे अनावरणही केले होते. उत्कृष्ट बांधकामाच्या बाबतीत गोवा शिपयार्डबद्दल गौरवोद्गार काढण्यात आले होते.दरम्यान, भारतीय नौदलासाठी दक्षिण कोरियाच्या कांगनम कॉर्पोरेशनशी संयुक्त विद्यमाने बांधण्यात यावयाच्या १२ मोठ्या युद्धनौकांबाबतच्या (माइनस्वीपर) वाटाघाटी निविदा प्रक्रियेतील दोषामुळे अयशस्वी ठरल्या आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ही माहिती दिली. निविदेमध्ये चूक होती ती या टप्प्यावर दुरुस्त करणे कठीण आहे. तंत्रज्ञान भागीदारासाठी नव्याने रिक्वेस्ट फॉर प्रोपोझल काढल्यानंतरच भागीदार निवडून या १२ नौका बांधण्याचे काम सुरू होईल, अशी माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली.हे काम आठ ते दहा वर्षांत पूर्ण करायचे आहे, त्यामुळे एक ते दोन वर्षांचा विलंब लागला तरी हरकत नाही, असे पर्रीकर यांचे मत आहे. पर्रीकर केंद्रात संरक्षणमंत्री असताना तब्बल ३२ हजार कोटींच्या कामांचे कंत्राट गोवा शिपयार्डला देण्यात आलेले आहे. यामुळे शिपयार्डचे कामही वाढले आहे.

टॅग्स :goaगोवा