विश्वजीत राणेंचा भाजपामध्ये प्रवेश

By Admin | Updated: April 7, 2017 05:23 IST2017-04-07T05:23:18+5:302017-04-07T05:23:18+5:30

आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर विश्वजीत प्रतापसिंग राणे यांनी गुरुवारी भाजपात प्रवेश केला.

Vishwajit Rane's entry into the BJP | विश्वजीत राणेंचा भाजपामध्ये प्रवेश

विश्वजीत राणेंचा भाजपामध्ये प्रवेश

पणजी : आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर विश्वजीत प्रतापसिंग राणे यांनी गुरुवारी भाजपात प्रवेश केला. मंत्रिमंडळात त्यांचा समावेश निश्चित झाला आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते प्रतापसिंग राणे यांचे विश्वजीत हे चिरंजीव आहेत. वडिलांच्या पर्ये मतदारसंघातही भाजपा बळकट करू, असे त्यांनी सांगितले. प्रवेशावेळी सुमारे ८०० कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Vishwajit Rane's entry into the BJP